लोकवाङमय गृह

Shop

माणदेश : दरसाल दुष्काळ । आनंद विंगकर

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

माणदेशाच्या बरडभूमीचा विस्तीर्ण भूभाग सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही तालुक्यांत पसरलेला आहे. माण नदीचे खोरे म्हणजे, माणदेश. येथील जनजीवन शेती आणि पशुपालनाने व्यापले आहे. या जनजीवनाची यथायोग्य नोंद इतिहास-भूगोल आणि समाजशास्त्रात नाही. व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात, बेबी कांबळे, सीताराम सावंत इत्यादींच्या साहित्य संबंधाने काही तुरळक प्रयत्न झाले आहेत. कृष्णा इंगोले यांचा ‘माणदेश : स्वरूप आणि समस्या’ हा एक अपवाद वगळता, या प्रदेशाचे यथायोग्य आकलन नोंदवण्याचे डोळस प्रयत्न झाले नाहीत. विंगकर यांनी परिसरसापेक्ष वैचारिक / सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा तपशीलात हा भू-भाग समजून घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सुपीक पट्ट्यालगतचा कायम अवर्षणग्रस्त हा दुष्काळी पट्टा भौगोलिकतेसह सांस्कृतिक वेगळेपणाने उठून दिसतो. येथे सर्व भटक्या जनसमूहांची विशेषतः पशूपालक समूहांची बहुतांशी उपस्थिती दिसते. या प्रदेशाचे यथायोग्य आकलन नोंदविण्याचा प्रयत्न प्रत्यक्षातील पाहणीतून, आलेल्या अनुभवातून विंगकर यांनी केला आहे. या लेखनातून त्यांनी माणदेशच्या समूहसंस्कृतीचे धारणासंचित उलगडले आहे.
– दत्ता घोलप

Additional information

लेखक

आनंद विंगकर

पृष्ठसंख्या

180

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “माणदेश : दरसाल दुष्काळ । आनंद विंगकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com