Additional information
| लेखक | शांताराम जनी लक्ष्मी बुधाजी पंदेरे |
|---|---|
| पाने | 220 |
| बांधणी | पेपरबॅक |
| मुखपृष्ठ | सरदार जाधव |
| ISBN | 978-93-93134-79-0 |
| पहिली आवृत्ती | जून २०२५ |
Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
काही दोष नसताना ज्यांना शेकडो वर्षे साधी अक्षर-ओळख इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारली होती, अशा समाज-अर्थ घटकांतील तरुण-तरुणी, प्रौढ स्त्री-पुरुष स्वतःच्या आयुष्याबद्दल, आत्मकथनच नाही तर विविध प्रकारांतून व्यक्त होऊ लागले आहेत. ही एक प्रकारची ‘ग्रासरूट नॅनो साहित्यिक, सांस्कृतिक क्रांती’ सुरू आहे.
एका बाजूला लेखक त्यांच्या आठवणीतून त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग / घटना, त्यातून त्यांच्या मनात उठलेले भावना तरंग, विचार शृंखला वाचकांशी शेअर करत असतात. तर त्याच वेळी ते प्रसंग /घटना ज्या काळात घडलेल्या असतात त्या काळातील कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रक्रियांनादेखील स्पर्श करत असतात. व्यक्तीचे आत्मकथन आणि ती फ्रेम कधीच वेगळे काढता येणारे नसतात. या फ्रेमचे वैशिष्ट्य हे की ती व्यक्तिनिरपेक्ष असते. आत्मकथन करणाऱ्या पुरती मर्यादित नसते. त्या काळातील अगणित व्यक्ती/ कुटुंबांना आपल्यात सामावून घेत असते.
‘आऱ्या’ च्या कालखंडाच्या दस्तावेजीकरणाला ‘स्टॅण्ड अलोन’ महत्त्व आहेच.
पण त्यातून आजच्या काळातील कोट्यवधी कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील गुंता सोडवण्यासाठी किमान अंशतः दिशादिग्दर्शनदेखील होऊ शकेल असे वाटते.
| लेखक | शांताराम जनी लक्ष्मी बुधाजी पंदेरे |
|---|---|
| पाने | 220 |
| बांधणी | पेपरबॅक |
| मुखपृष्ठ | सरदार जाधव |
| ISBN | 978-93-93134-79-0 |
| पहिली आवृत्ती | जून २०२५ |
Reviews
There are no reviews yet.