लोकवाङमय गृह

Shop

डॉ. आंबडेकरांची जातीमीमांसा । उमेश बगाडे

50.00

विचारवंताचे विचार सूत्ररूपाने मांडणे, त्यासाठी लागणारी संकल्पनात्मक भाषेची जुळवाजुळव करणे आणि त्याची सैद्धांतिक स्पष्टता व दर्जा कायम राखणे ही संशोधकाची मूलभूत जबाबदारी असते. अन्यथा त्यामधून ज्ञानशास्त्रीय पातळीवर विचारवंतावर अन्याय होण्याची शक्यता असते. विचारवंतावर असा ज्ञानशास्त्रीय अन्याय होणार नाही याची खबरदारी लेखकाने आपल्या ग्रंथात घेतलेली आहे. खरं म्हणजे, उमेश बगाडे यांनी ही जबाबदारी गेली कित्येक वर्षे त्यांच्या वैचारिक लिखाणातून पार पाडत आले आहेत. ज्यांना सूत्ररूपाने विचार समजावून घेण्याची सवय नसते, ते विचारवंतांवर ज्ञानशास्त्रीय अन्याय करत असतात; अशांना सावध करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. डॉ. आंबेडकरांचे विचार अचूकपणे समजावून घेताना सैद्धांतिक सूक्ष्म आशय आत्मसात करण्याची आव्हाने प्रस्तुत ग्रंथात त्यांनी पेलली आहेत. डॉ. आंबेडकरांच्या जातीमीमांसेची वैशिष्ट्यपूर्ण परिमाणे स्पष्ट करून त्यांच्या विचारांना आकलनाच्या उच्चतम पातळीवर त्यांनी नेऊन ठेवले आहे.
– गोपाळ गुरू

Additional information

लेखक

उमेश बगाडे

पृष्ठसंख्या

92

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. आंबडेकरांची जातीमीमांसा । उमेश बगाडे”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com