Additional information
| लेखक | अर्जुन डांगळे |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 180 |
| बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
भाबडे आणि बेगडी लिहिण्यापासून मी स्वत:ला दूर ठेवले आहे. कारण लेखन हा माझा व्यवसाय नाही. मी ज्या दलित साहित्याचा पुरस्कर्ता आहे त्याला केवळ साहित्य मानत नाही. ती चळवळ मानतो. चळवळ करताना किंवा निष्ठा जोपासताना जे सातत्य लागते, जो मानसिक आणि वैचारिक / सामाजिक कणखरपणा लागतो तो जपण्याचा प्रयत्न मी माझ्या लेखनातून करत असतो. मी ज्या वेळी दलित साहित्याला चळवळ म्हणून मानतो त्या वेळी कलामूल्यांना अव्हेरतो असे नाही. उलट चळवळीच्या नावाखाली जी बटबटीत शब्दबंबाळ रचना पेश केली जात आहे तिला मी नाकारतो. अलीकडे १९८० नंतरच्या दलित कवितेवरील समीक्षा ग्रंथ माझ्या वाचनात आला. तो खूपच पूर्वग्रहदूषितपणे लिहिलेला वाटला. कवितासंग्रह चांगले पण समीक्षा तोकडी आहे. चळवळीची परंपरा नाकारणारी, अनुबंध तोडणारी ही प्रवृत्ती, न्यूनगंडाने पछाडलेली व अलगतावाद जोपासणारी आहे. समीक्षेचा मूलाधार हा समीक्षकांच्या ठायी असलेला नितळपणा होय.
माझ्या समीक्षात्मक लेखनात हा नितळपणा मी जपण्याचा प्रयत्न करतो. माझी सावली त्या लिखाणावर पडणार नाही किंवा दुसऱ्याची सावली त्याच्यावर पडणार नाही याची मी दक्षता घेतो. आणि मला ते शक्य होते कारण मी कोणत्याही साहित्यिक कंपूत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व हाच माझा विचार कंपू होय.
– अर्जुन डांगळे
| लेखक | अर्जुन डांगळे |
|---|---|
| पृष्ठसंख्या | 180 |
| बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.