लोकवाङमय गृह

Shop

मार्ग | सिद्धार्थ देवधेकर

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

सिद्धार्थ देवधेकर यांना समकालीन समाजाच्या नैतिक स्खलन आणि अध:पतनाची नाडी बिनचूक सापडली आहे, असे त्यांच्या ‘मार्ग’ या संग्रहातील दीर्घ कथा वाचताना सतत जाणवत राहते. गाव, तालुका वा जिल्हा पातळीवर राजकीय व प्रशासकीय हितसंबंधाच्या आधारे चालणारे मूल्यहीन गैरव्यवहार आणि त्यापायी होणारी सामान्य माणसांच्या आयुष्याची फरफट त्यांच्या कथांच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या दोन तीन दशकांत बोकाळलेला सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार, प्रशासन आणि गावपातळीवरील पुढाऱ्यांची मग्रुरी, वैचारिक दिवाळखोरी, हितसंबंधांच्या राजकारणात गावखेड्यांचे बकाल होत जाणे यांविषयी या कथा बोलत राहतात.

आंबेडकरी विचारांशी प्रामाणिक असलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्या माणसाच्या नजरेतून देवधेकर आपल्या अवतीभवतीच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय व्यवहारातील गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या कथांशी संबंधित पात्रे, त्यांची भाषा, अनुभवविश्व यांना एक प्रकारची प्रत्यक्षदर्शी निवेदकाची विश्वासार्हता प्राप्त होते. मराठीमध्ये अशा प्रकारच्या प्रत्यक्ष अनुभव घेऊन, आसपासच्या समाजातल्या माणसांचे रोजमर्रा संघर्षमय जगणे समजून घेऊन, प्रामाणिकपणे केलेले लेखन अपवादात्मकच म्हणावे लागेल. देवधेकर यांनी या कथांमधून उभ्या केलेल्या ग्रामीण भागातील अंतस्तराचं तपशीलवार चित्रण करणाऱ्या प्रातिनिधिक व्यक्तिरेखा, त्यांची मानसिक घालमेल, भावनिक गुंते, हेवेदावे, जातीय संघर्ष, पाणीटंचाई-रस्ते-आरोग्य-स्वच्छता अशा असंख्य दैनंदिन जगण्याशी जोडलेल्या समस्या, त्याला साजेशी भाषाशैली हे सारेच या दीर्घकथांना वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. एखाद्या लघुकादंबरीचा अवकाश पोटी सामावून घेतलेल्या या प्रत्येक दीर्घ कथेमध्ये अनेक अंगांनी वाचकाला खिळवून ठेवण्याची क्षमता असल्याचे जाणवते.

सिद्धार्थ देवधेकरांचे मराठी कथाकार म्हणून असलेले स्थान अधिक बळकट करणाऱ्या या कथा आहेत, असे निश्चितच म्हणता येईल.

 

– प्रवीण दशरथ बांदेकर

Additional information

लेखक

सिद्धार्थ देवधेकर

मुखपृष्ठ

संदीप देशपांडे

पृष्ठसंख्या

216

बांधणी

Paperback

ISBN

978-81-180831-2-2

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्ग | सिद्धार्थ देवधेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com