लोकवाङमय गृह

Shop

पोटमाळ्यावरचे सर्बरीत उच्चार । प्रदीप कोकरे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹200.00.

‘पोटमाळ्यावरचे सर्बरीत उच्चार’ या संग्रहातल्या कविता हळहळ, तळमळ, वणवण अशा तीन भागांत आहेत. विभागांची नावे अर्थपूर्ण आहेत. संग्रहातल्या कवितांचे सार या तीन शब्दांमध्ये सामावलेले आहे. या कविता वाचताना प्रथम जाणवतात ती शब्दांची रूपे, एका शब्दानंतर येणारा दुसरा शब्द, या शब्दांची जुळणी असलेल्या, कमीतकमी शब्दांत अर्थाशयाचे विविध स्तर असलेल्या ओळी. ही भाषा नवी आहे, निराळी आहे, या कवीचीच ती भाषा आहे.

नळाच्या धारेसारखं शुभ्र हास्य, रैवारच्या जिभेला सुटते खाज, उजेडाचं स्वगत तोंडपाठ, ताटातल्या ताटात धांदल धांदलते धांदलीत, मार्गस्थ कपाळावर नाइलाजाचे कळप या ओळींतून एक जगणे आकारत जाते.

ते त्रस्त, संत्रस्त असे आहे. एक अस्वस्थ मन सगळ्या जगण्यातून वावरत असते. या कवितांच्या निवेदकाचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे संघर्ष असलेले आयुष्य या कवितांमधून साकारत जाते. तसे ते कुणाचेही असू शकते. इथे एकट्याच्या अवतीभोवती एकट्याचा फापटपसारा आहे, इथे फाटका खिसा, फाटकं नशीब खिदळतं, कुठल्याही दवाउपचाराने शांत होत नाही, ही शरीर पोखरत चाललेली कीड, धगधगता वर्तमान डोळ्यांत खुपणारा असतो. या संग्रहातल्या ओळीच्या ओळी इथे देता येत नाहीत, मनात निनादत राहतात.

ही एक ओळ : हे मायाळू ऊन अधिकच बिलगतं, पडक्या घराच्या अवशेषांना. वाचकालाही अस्वस्थ करणारी ही एक ओळ : दु:खाची निर्वाणकळ पोटात, इतका शांत गळफास उर्वरित वर्षांचा.

मनात, कानात अनुरणन होत राहावे अशा या ओळी आहेत, असा हा कवितासंग्रह आहे.

– वसंत आबाजी डहाके

Additional information

लेखक

प्रदीप कोकरे

मुखपृष्ठ

अन्वर हुसेन

रेखाटने

अनुप सासवडे

पृष्ठसंख्या

104

बांधणी

Hardcover

ISBN

978-81-180831-5-3

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पोटमाळ्यावरचे सर्बरीत उच्चार । प्रदीप कोकरे”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com