लोकवाङमय गृह

Shop

जातिव्यवस्थेची अश्लीलता । शैलजा पाईक । भाषांतर : अनघा लेले

Original price was: ₹750.00.Current price is: ₹600.00.

Description

 

हे पुस्तक ‘तमाशा’ या प्रामुख्याने दलितांद्वारे सादर केल्या जाणार्‍या कलाप्रकाराचा पहिला सामाजिक आणि वैचारिक इतिहास सांगते आणि पितृसत्ताक समाजामध्ये वासना आणि तिरस्कार यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या दलित तमासगीर स्त्रियांना विसाव्या शतकातील भारताच्या आधुनिकीकरणाच्या केंद्रस्थानी ठेवते. लोकजीवनाचा, तमाशावर आधारित चित्रपटांचा, आणि आजवर अस्पर्श राहिलेल्या संग्रहित सामग्रीचा अभ्यास करून शैलजा पाईक यांनी जात, लिंगभाव, लैंगिकता आणि संस्कृती यांच्या संबंधांतील संघर्षाला जन्म देणार्‍या आणि त्याला आकार देणार्‍या तमाशावर प्रकाश टाकला आहे. दलित कलाकारांनी व नेत्यांनी माणुसकीवर दावा सांगण्यासाठी, स्वतःचा अस्सलपणा शाबित करण्यासाठी तसेच माणूस म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी तमाशातील हिंसा आणि कलंक यांचा नेहमीच सामना केला आहे.

दलित अभ्यासांच्या आंबेडकर केंद्रित इतिहासलेखनाचा आणि चळवळीवर भर देणार्‍या पद्धतींचा आधार घेऊन व त्यापासून फारकत घेऊन पाईक दलित जीवनाचा सामान्यपणा, दैनंदिनता तपासतात. अंतिमतः, लोकांचे समूह संस्कृतीबद्दलचे जे पर्याय निवडतात, ते भारतीय समाजातील समावेशकता, विषमता आणि जातीय हिंसेच्या संरचना यांच्याबद्दलच्या अधिक व्यापक प्रश्नांकडे घेऊन जातात हे त्या दाखवून देतात. त्याचबरोबर, दलित राजकारणाच्या परिवर्तनात्मक क्षमता तसेच लिंगभाव, लैंगिकता व मानवाचा जागतिक इतिहासाकडे पाहण्याचे नवीन मार्गही त्या खुले करतात.

Additional information

लेखक

शैलजा पाईक

भाषांतर

अनघा लेले

पृष्ठे

424

मुखपृष्ठ

Stanford University Press

बांधणी

Hardbound

ISBN

978-81-989061-7-5

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जातिव्यवस्थेची अश्लीलता । शैलजा पाईक । भाषांतर : अनघा लेले”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com