Additional information
| लेखक | कॉ. रवींद्र मोकाशी |
|---|---|
| मुखपृष्ठ | संदीप देशपांडे |
| पृष्ठसंख्या | 108 |
| बांधणी | Paperback |
| ISBN | 978-81-180831-3-9 |
Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
डाव्या व पुरोगामी चळवळीत धुळे जिल्ह्याचे स्थान विशेष आहे. या भागात अन्यायाविरोधात जागृती करण्यात व तळागाळातील मजुरांना संघटित करण्यात अगदी सुरुवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सक्षम भूमिका महत्त्वाची ठरली. शहराचे नगराध्यक्षपद व आमदारकी पक्षाने जिंकली व आपला प्रभाव पाडला.
डाव्या चळवळीचे महत्त्वाचे संघटन म्हणजे ‘मागोवा’, या संघटनेने आदिवासी जागृती आणि संघटन उभे केले. अशोक मनोहर, कुमार शिराळकर, अच्युत गोडबोले ही व इतर अनेक महत्त्वाची नावे या चळवळीशी जोडली गेली. कॉ. शरद पाटलांना कोण विसरू शकेल! तेपण इथलेच. या सर्वांना मदत करण्यात, सहकार्य देण्यात कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते उभे राहिले. त्यांत ‘कॉ. नांदेडकर’ हे महत्त्वाचे नाव! अगदी तरुण वयापासून सीतारामनी आपले आयुष्य स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठी खर्ची घातले, अनेकदा तुरूंगवास भोगला; आंतरजातीय लग्न केले… पत्नी कॉ. गुलाबनेही समर्थपणे साथ दिली…. शिक्षिकेची नोकरी सोडली. सिनेमा क्षेत्रातील के. ए. अब्बास, मुल्कराज आनंद व सीताराम यांनी मिळून ‘रेड ईगल को ऑप फिल्म कंपनी’ काढली व सामान्य लोकांकडून भागभांडवल जमा करण्याची जबाबदारी कॉ. गुलाबवर सोपवली. एक वर्षभर गुलाब मुलांना माहेरी सोडून देशभर फिरली. मुलांसाठीची तिची तगमग तिने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रांतून व्यक्त होते. अशा अनेक हालअपेष्टा या जोडप्याने सहन केल्या. कॉ. रवींद्र मोकाशींनी या पुस्तकातून त्या वेळचा काळ समर्थपणे उभा केला आहे.
आता या पुस्तिकेच्या निमित्ताने ‘लोकवाड्मय गृह’ने हे कार्य लोकांसमोर आणले आहे. त्याचे योग्य ते स्वागत होईल, याची खात्री आहे. स्वातंत्र्य चळवळ, भगतसिंगांची भेट आणि चर्चा, पोर्तुगिजांविरुद्ध गोवा मुक्तिसंग्राम आणि त्यात अटक व छळ हे डॉ. सीताराम नांदेडकरांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे ! त्यांचं जगणं, त्यांचा संघर्ष समजून घेणं हे आपल्यालाही प्रेरणादायक ठरेल, यात दुमत नाही.
कॉ. डॉ. भालचंद्र कानगो
| लेखक | कॉ. रवींद्र मोकाशी |
|---|---|
| मुखपृष्ठ | संदीप देशपांडे |
| पृष्ठसंख्या | 108 |
| बांधणी | Paperback |
| ISBN | 978-81-180831-3-9 |
Reviews
There are no reviews yet.