Additional information
| संपादक | अर्जुन डांगळे, डॉ. माया पंडित, डॉ. प्रज्ञा दया पवार |
|---|---|
| मुखपृष्ठ | सतीश भावसार |
| पृष्ठसंख्या | 448 |
| ISBN | 978-81-998771-8-4 |
| बांधणी | Hardcover Getfold |
Original price was: ₹1,000.00.₹800.00Current price is: ₹800.00.
बाबुराव बागूल, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ हे सारे दलित साहित्याच्या चळवळीतील आघाडीचे, बिनीचे शिलेदार. त्यांनी साहित्य, लिहिण्याचा व्यवहार, साहित्याचे नायक कोण असू शकते याबद्दलचे संकेत, आत्माविष्कारातील ‘आत्म’, ‘सत्य’, ‘मूल्ये’, ‘सौंदर्य’ अशा खूप साऱ्या संकल्पना आमूलाग्र बदलून टाकल्या. साहित्यावरील खोट्या जाणीवभ्रमांनी तयार केलेले शुचितेचे अवगुंठन त्यांनी फाडून, भिरकावून दिले आणि भवतालाच्या वास्तवावर झगझगीत प्रकाश टाकला. त्यातून शोषितांच्या, वंचितांच्या आयुष्यातले धगधगीत शोषणसत्य धर्माचारांच्या, मिथकांच्या, बळाने जोपासलेल्या सवर्णांच्या स्वार्थमूलक अंधश्रद्धांच्या कचाट्यातून सोडवून त्यांनी प्रस्थापितांच्या चावडीवर फराफरा खेचून सर्वांसमोर आणले. भारतातील भांडवली, वर्गीय, जातीय, पितृसत्ताक सत्ताकारणाने घातलेला नंगा नाच त्यांनी जनसामान्यांना दाखवला. भारतातील चिरफाळलेल्या आधुनिकतेच्या भीषण दर्शनाने त्यांनी साहित्यातील तथाकथित पुरोगामित्वाचे गड नि तटबंद्या उद्ध्वस्त केल्या. एका अर्थाने या नवसर्जनाची दमदार व लक्षणीय सुरुवात आपल्या साहित्यातून करणारे दया पवार हे दलित साहित्याचे उद्गाते होते.
दलित साहित्याच्या चळवळीचा हा उज्ज्वल इतिहास दया पवार यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या या पुस्तकातून आपल्याला दिसून येतो. त्यांच्या समग्र साहित्याशी परिचित असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी व अभ्यासकांनी लिहिलेल्या यातील महत्त्वपूर्ण लेखांमध्ये आपल्याला दया पवारांनी मराठी व एकूणच शोषितांच्या साहित्यपरंपरेला जे योगदान केले त्याचा लेखाजोखा मिळतो; दलित साहित्याभ्यासाच्या अनेक ऐतिहासिक दृष्टी मिळतात.
– डॉ. माया पंडित
| संपादक | अर्जुन डांगळे, डॉ. माया पंडित, डॉ. प्रज्ञा दया पवार |
|---|---|
| मुखपृष्ठ | सतीश भावसार |
| पृष्ठसंख्या | 448 |
| ISBN | 978-81-998771-8-4 |
| बांधणी | Hardcover Getfold |
Reviews
There are no reviews yet.