Additional information
| लेखक | डॉ. प्रवीण राऊत |
|---|---|
| पाने | 112 |
| बांधणी | पेपरबॅक |
| आवृत्ती | पहिली आवृत्ती : जून २०२५ |
| ISBN | 978-93-93134-92-9 |
Original price was: ₹200.00.₹160.00Current price is: ₹160.00.
डॉ. प्रवीण राऊत यांचे ‘स्वराज्य निर्मिती’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. त्यांनी शीर्षकाच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत अठरापगड जातींचे योगदान’ या स्पष्टीकरणावरूनच पुस्तकाचा आशय अगदी स्पष्ट रीतीने आपल्या ध्यानात येतो. शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे रयतेचे राज्य म्हटले जाते आणि रयतेमध्ये याचा अर्थ प्रजेमध्ये समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांचा अंतर्भाव होतो. हे स्वराज्य निर्माण करताना महाराजांना आपल्या समाजातील विविध जातीजमातींनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन समर्थन दिले होते आणि प्रसंगी आत्मबलिदानही केले होते. त्यांचा इतिहास नोंदवला जाणे, त्याचे दस्तावेजीकरण होणे, हे इतिहास समजण्यासाठी अत्यावश्यक आहे. शिवाय, महाराजांना ज्यांनी सहकार्य केले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. डॉ. प्रवीण राऊत हे कर्तव्य पार पाडत आहेत, हा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनेही सुखद संकेत आहे. वाचकांपैकी कोणी त्यांना काही सुचवू इच्छित असेल, तर ते त्याचे स्वागतच करतील. त्यांच्या प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा!
– डॉ. आ. ह. साळुंखे
(ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित)
| लेखक | डॉ. प्रवीण राऊत |
|---|---|
| पाने | 112 |
| बांधणी | पेपरबॅक |
| आवृत्ती | पहिली आवृत्ती : जून २०२५ |
| ISBN | 978-93-93134-92-9 |
Reviews
There are no reviews yet.