Additional information
लेखक | डॉ. भवान महाजन |
---|---|
पृष्ठसंख्या | 192 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
भूतकाळाचे सिंहावलोकन आणि वर्तमानाचे भान हा आत्मकथनाचा आत्मा आहे. समाज जीवनाकडे पाहण्याचा हा झरोका आहे.
डॉ भवान विठ्ठल महाजनांचे ‘रस्ता शोधताना’ हे आत्मकथन गोदावरीच्या काठावरल्या पैठण सारख्या लहान गावात सुरू झालेलं. बेताच्या परिस्थितीतही उत्तम संस्कारीत झालेलं. स्वातंत्र्याची आग हृदयात घेऊन तळमळीने कार्य करणाऱ्या क्रांतिकारकाच्या पोटी जन्म घेतलेलं. लोकसेवेचे व्रत घेतलेल्या आजोबांच्या सहवासातलं. विनोबांसारख्या ऋषितुल्य व्यक्तीच्या सहवासाचा स्पर्श झालेलं. पंडित जसराज यांच्या भातृ भावनेनं समृद्ध झालेलं. आयुर्वेद जगणाऱ्या कुटुंबात राहिलेलं. तेव्हा ते उत्तम सर्जन होण्यामागे या प्रेरणा होत्या हे ओघानंच आलं.
आयुष्य म्हणजे संघर्ष, ध्येय म्हणजे वाटचाल. तेव्हा इंग्लंडला जाण झालं तरी मनातल्या सेवावृत्तीने थेट खेड्यातच येऊन प्रॅक्टिस सुरू केली. ते अनुभव मनाला हेलावून टाकणारे आहेत. या प्रवासात कुटुंबीय, गुरु, मित्र ,सहकारी, सहचरि हे प्रसंगानुरूप सामील आहेच पण राजकीय, वैचारिक / सामाजिक, धार्मिक ,परिस्थिती चा पटही सतत जाणवणारा आहे.
ओघवती भाषा आणि प्रांजळ कथन यातून एका प्रामाणिक माणसाची प्रतिमा उजळून समोर येते. ध्येयवादी माणसाच्या जीवनातले संघर्ष, त्यातली वळण, उदासीनता हे सगळं वाचकांपर्यंत पोचावं ही इच्छा.
लेखक | डॉ. भवान महाजन |
---|---|
पृष्ठसंख्या | 192 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.