Additional information
लेखक | प्रमोद मुजुमदार |
---|---|
पृष्ठसंख्या | 232 |
बांधणी | पेपरबॅक |
आवृत्ती | तिसरी आवृत्ती |
Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00.
गेले एक दशक भारतीय राजकारणात हिंदुराष्ट्र संकल्पनेने उच्छाद मांडला आहे. आजचे मणिपूर त्यात जळून खाक होताना दिसते आहे. तेथील आदिवासी समूहांचा नरसंहार होताना दिसत आहे, तर त्यांची पूजास्थाने उद्ध्वस्थ होत आहेत. हा जंगलवणवा हळूहळू इतर शहरी भागांतही भडकविण्याचे हिंदुराष्ट्रवादी प्रयत्न करतील, हे स्पष्ट दिसत आहे. कधी मुसलमान तर कधी दलित त्यांची शिकार बनत आहेत. त्यामुळे भारत हा आज अशांत आणि अराजकमय बनला आहे. त्यातून त्याला बाहेर काढणे आणि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची पुनर्स्थापना करणे हीच आजची सर्वात मोठी जबाबदारी समंजस नागरिक आणि लोकशाहीवादी राजकीय पक्षांवर येऊन पडलेली आहे.
श्री. प्रमोद मुजुमदार यांनी या हिंदुत्ववादी राजकारणाच्या उगमाचा आणि त्याच्या प्रचारासाठी वापरलेल्या साधनांचा मुळातून शोध घेऊन ‘हिंदुत्त्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. तो अभ्यासक, सजग नागरिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, याची खात्री वाटते, त्यामुळेच तो जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
– रावसाहेब कसबे
लेखक | प्रमोद मुजुमदार |
---|---|
पृष्ठसंख्या | 232 |
बांधणी | पेपरबॅक |
आवृत्ती | तिसरी आवृत्ती |
Reviews
There are no reviews yet.