Additional information
लेखक | वीरा राठोड |
---|---|
पाने | १७२ |
बांधणी | पेपरबॅक |
ISBN | 978-93-82906-03-2 |
आवृत्ती | पहिली आवृत्ती- फेब्रुवारी २०१८ |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
वीरा राठोड यांच्या या लेखसंग्रहाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येईल ते म्हणजे, त्यांची त्यांच्या वयाला साजेल अशी तरुण, आश्वासक आणि त्याचवेळी ‘ग्लोबल’ नजर. संपूर्ण लेखसंग्रह वाचताना सतत याची जाणीव होत राहते. त्यांची भाषा आश्वासक तर आहेच;पण ती अभिनिवेश टाळूनही व्यवस्थेला ज्या ठामपणे प्रश्न, जाब विचारते, त्यातून त्यांचा त्या प्रश्नावरचा समग्र अभ्यास आणि विचारांवरची अविचल निष्ठा दिसते.
ते आदिवासी, भटके यांच्या इतिहासात शिरताना भावुकही होत नाहीत, आक्रमकही होत नाहीत, तर अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती छोट्या-मोठ्या तपशिलांसह अशी मांडतात की एखाद्या पुरातत्व संशोधकाने वस्तुनिष्ठपणे व काळाशी प्रामाणिक राहत, हाती लागलेल्या गोष्टींचा क्रम लावावा आणि त्याची संगती ऐतिहासिकदृष्ट्या लक्षात आणून द्यावी. ही दृष्टी,ही मांडणी नवी आहे.
त्यांचं लेखन वाचताना आपण नीरस आकडेवारी, सनावळ्या, गतानुगतकाच्या आरोप-प्रत्यारोपाने रंगवलेलं तेच ते वाचत नसून, आजच्या तरुण संवेदनशील मनाच्या, विचाराच्या परिप्रेक्ष्यातून ते वाचत आहोत असं वाटतं. ते अधिक आश्वासक व प्रसन्न करणारं आहे आणि त्यामुळेच हा ‘हस्तक्षेप’ आवश्यक वाटतो.
– संजय पवार
लेखक | वीरा राठोड |
---|---|
पाने | १७२ |
बांधणी | पेपरबॅक |
ISBN | 978-93-82906-03-2 |
आवृत्ती | पहिली आवृत्ती- फेब्रुवारी २०१८ |
Reviews
There are no reviews yet.