Additional information
लेखक | तारा भवाळकर |
---|---|
पाने | १६८ |
बांधणी | पेपरबॅक |
पुनर्मुद्रण | नोव्हेंबर २०२४ |
Original price was: ₹250.00.₹215.00Current price is: ₹215.00.
स्त्रीमनातील न्यूनगंडभाव आणि पुरुषमनातील अहंगंडभाव हे दोन्ही स्त्रीलाच नव्हे तर पुरुषालाही जीवनातला आनंद अन् समाधान मुक्तपणे घेऊ देत नाहीत. स्त्रीमुक्तीचा प्रश्न हा केवळ स्त्रीचा नसून तो समग्र मानवजातीच्या निरामयतेचा, स्वास्थ्याचा प्रश्न आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषविरोध नव्हेच नव्हे, असलेच तर ते पुरुष साहाय्यच आहे. एकूण मानवमुक्तीच्या वाटेवरचा स्त्रीमुक्ती हा एक टप्पा आहे, अशा विचाराप्रत स्त्रीवादी अभ्यासक येत आहेत.
गेल्या दोन-अडीचशे वर्षांत भौतिक प्रगतीने प्रचंड वेग घेतला आहे आणि मध्ययुगीन कष्टप्रद जीवनसंघर्षातून माणसाला खूपसे भौतिक स्वास्थ्य दिले आहे. असे असले तरी मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी झाले आहे असे दिसत नाही. उलट वस्तुरूप समृद्धीच्या माऱ्याने नवीन अस्वस्थता निर्माण होत आहे.
अशा वेळी संताचे मुक्तिआंदोलन आणि विशेषतः मराठी संत स्त्रियांची भक्तिक्षेत्रातील मुक्तिआंदोलनाची भूमिका येथील सांस्कृतिक पर्यावरणात तपासून पाहण्याचा प्रस्तुत प्रयत्न आहे. संत स्त्रियांच्या आध्यात्मिक मुक्तिकल्पनेचा आणि प्रत्यक्ष जीवनसंघर्षाचा आजच्या स्त्रीमुक्ती संदर्भात काही संबंध आहे का हे शोधण्याचा प्रस्तुत लेखन हा एक नम्र प्रयत्न आहे.
लेखक | तारा भवाळकर |
---|---|
पाने | १६८ |
बांधणी | पेपरबॅक |
पुनर्मुद्रण | नोव्हेंबर २०२४ |
Reviews
There are no reviews yet.