Additional information
संपादक | जी. के. ऐनापुरे |
---|---|
पृष्ठसंख्या | 168 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
बाबूराव बागुलांची कथा व्यवस्थेने गांजविलेल्या शोषित वर्गाचे प्रतिनिधित्वकरणारी कथा आहे . दलित, ग्रामीण आणि महानगरीय परिप्रेक्ष्यात त्यांची कथा विस्तारत जाते . धर्माधिष्ठित आणि जातधिष्ठित व्यवस्थेने दलित, शोषित आणि स्त्रियांचे जगणे कसे नासवून टाकले याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कथेतून दृग्गोचर होते . त्यापाठीमागे मार्क्सवादी आणि आंबेडकरी तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे त्यांची कथा विध्वंसापेक्षा सर्जनतेच्या पातळीवर उत्कटतेने अवतरते . विचारांची मांडणी कथेत प्रविष्ट होत असली तरी त्यांची कथा प्रचारी आणि प्रसारी सूर आळविताना दिसत नाही . कलात्मकता आणि भावनात्मकता , आशयसूत्रे आणि अभिव्यक्तीचे तंत्र कथेची उंची वाढवितात व तिला जागतिक पातळीवर घेऊन जातात .जी. के. ऐनापुरे यांनी बाबूराव बागुलांच्या असंग्रहित कथांना ‘सूर्याचे सांगाती’च्या रूपात वाचकांना बाबुरावांच्या कथेचे दालन उघडून दिले आहे. जी.कें. नी आपल्या दीर्घ प्रस्तावनेतून बाबूराव बागुलांच्या कथेची केवळ वैशिष्ट्ये सांगितले नसून त्यांनी बागुलांच्या कथेतून नवकथेची (प्रसंगी देशीवादाची ) बीजे कशी अवतरली आहेत , त्याचे विश्लेषण आणि संशोधन केले आहे. मार्क्सवादी तत्त्वज्ञान, आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि हिंदू तत्त्वज्ञानाच्या एकसंघतेतून मानवी जीवनाचे अनेक पदर बागुलांनी कसे उलगडले आहेत , ते मंडित केले आहे . जी .के. ऐनापुरे यांनी असंग्रहित कथांचे संपादन करून त्यांच्या या कथा ‘ जेव्हा मी जात चोरली होती ‘ आणि ‘ मरण स्वस्त होत आहे ‘ या कथासंग्रहातील कथांप्रमाणेच समांतर जाणारी कथा आहे, असा निष्कर्ष काढला आहे .
संपादक | जी. के. ऐनापुरे |
---|---|
पृष्ठसंख्या | 168 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.