Additional information
लेखक | मोहन रणसिंग |
---|---|
पृष्ठसंख्या | 278 |
₹225.00
आदिवासी जीवनात लोककलांना विशेष स्थान असते. ह्या लोककला लोकनृत्ये व लोकगीतांच्या माध्यमातून सादर होतात. लोककला अनुकरणातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असतात. लोकगीते मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतात. ह्या लोककला काही विशेष मोसमांत, सणासुदीला, धार्मिक कार्याच्या वेळी स्वतःच्या परिसरात स्वानंदासाठी सादर केल्या जातात.
लोककलांचा प्राचीन वारसा ठाकर जमातीने विविध स्वरूपात जोपासून ठेवलेला आहे. यात अकरा पुरुषप्रधान लोककला आहेत व तीन स्त्रीप्रधान लोककला आहेत. स्त्रियांच्या लोककला ह्या लोकगीतांवर आधारित असतात. पुरुषांच्या लोककलाही लोकगीतांवरच आधारित असतात पण त्यात वैविध्य आहे. एवढ्या वैपुल्याने जोपासून ठेवलेल्या लोककला अन्य कोणत्याही समाजात आढळणार नाहीत.
Reviews
There are no reviews yet.