Additional information
लेखक | जितेंदर भाटिया |
---|---|
अनुवाद | चंद्रकांत भोंजाळ |
पृष्ठसंख्या | 124 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹175.00.₹150.00Current price is: ₹150.00.
ही कथा कलकत्त्यासारख्या महानगरात घडणारी. महानगरात एखाद्याचा भरदिवसा ‘खून’ व्हावा ही घटना काही ‘विशेष’ घटना राहिलेली नाही. एखाद्याच्या मृत्यूची दखल घ्यायलाही ह्या महानगरात कुणाला वेळ नसतो. अशा शहरात रिटायर्ड प्राध्यापक कनाईलाल चौधरी यांनी एक खून होताना पाहिला. हा त्यांचा पहिला अपराध. आपण खून होताना पाहिला हे त्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं हा त्यांचा दुसरा अपराध, नंतर पोलिसांच्या हातातील खेळणं बनण्यास त्यांनी नकार दिला हा त्यांचा तिसरा अपराध.
अपराध, कायदा आणि शासकीय अवहेलना ह्या तिठ्यावर उभा असलेला एक अभूतपूर्व प्रतिनायक – प्रा. कनाईलाल चौधरी ह्यांच्या रूपाने आपल्या समोर येतो आहे. एकीकडे साध्या सरळ जीवनमूल्यांची भ्रष्ट शासन यंत्रणेकडून होणारी पायमल्ली, तर दुसरीकडे मध्यमवर्गीय माणसाची साहसहीनता, त्यामुळे त्याची होणारी कुचंबणा चित्रित करणारी ही कथा.
लेखक | जितेंदर भाटिया |
---|---|
अनुवाद | चंद्रकांत भोंजाळ |
पृष्ठसंख्या | 124 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.