Additional information
लेखक | जयदेव डोळे |
---|---|
पाने | २५६ |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
साहित्याची समीक्षा, चित्रपट व नाटके यांची परीक्षणे आणि नृत्य, गायन या कलांची मीमांसा जशी नियमित होते, तशी प्रसारमाध्यमांची होत नाही. माध्यमांमधून जे सादर होत असते ते सारे तात्कालिक असते. त्यामुळे त्याबाबतचा प्रतिसाद वा प्रतिक्रिया तात्कालिक असतात. ‘काय ही बातमी छापलीय!’ किंवा ‘हे टीव्हीवाले चेकाळलेत नुसते’ अशी तेवढ्यापुरतीची टीका बहुतेकांच्या तोंडून बाहेर पडते. तिला अन्य टीकांप्रमाणे स्थान मिळत नाही. टीकेचीसुद्धा एक परंपरा आहे. तीन विविध सिद्धांत, मूल्ये,विचार, रचना आहेत. पण टीका कलांपुरतीच पुरतीच जखडून राहिली. क्रीडेचे एक नवे क्षेत्र तिला मिळाले आहे. अनेक खेळांच्या समीक्षा सर्व माध्यमांतून नियमित, विविधांगांनी व मोठ्या संख्येने अवतरु लागल्या आहेत. निवृत्त खेळाडू, जाणकार किंवा नुसते उत्साही त्यात असतात. आर्थिक घडामोडींची दखल समीक्षेच्या रूपात सतत घेतली जाते. तिचा प्रेक्षक व ग्राहक मोठा आहे. म्हणजे लोकांपुढे सादर होणाऱ्या बऱ्याच गोष्टींची समीक्षा होते. लोकही त्यात रस घेतात. मात्र लोकांपुढे रोज आणि क्षणाक्षणाला येणाऱ्या माध्यमांच्या हालचाली मात्र समीक्षेतून वजा! लोक अभावितपणे ती करीत असूनसुद्धा. लोकशाहीचे एवढे मोठे साधन, पण ते मोकळेच.
स्वतःला अंकुश म्हणवून घेणारी माध्यमे कोणत्याही लागमावाचून उधळलेलीच !
Reviews
There are no reviews yet.