Additional information
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 332 |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.
‘सबकु सलाम बोलो’ हे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे सर्व दुनियेचा निरोप घेऊन स्वर्गारोहण करण्यापूर्वी काढलेले उद्गार आहेत. माझ्या दृष्टीने राजर्षी शाहूंचा हा उद्गार म्हणजे त्यांच्या कार्याबद्दल त्यांना वाटणाऱ्या कृतार्थतेचा आविष्कार आहे. ज्या बहुजन समाजाच्या, मागासलेल्या समाजाच्या उद्धारासाठी राजर्षी शाहू हयातभर अन्यायाशी लढत राहिले, त्या समाजाचाच ते शेवटीही विचार करीत होते. असाही त्याचा अर्थ होतो. गजानन इंदुशंकर देशमुख यांनी या शाहू चरित्राचे नाव ठेवण्यामागे एक प्रकारची काव्यात्मक कल्पकता दाखवली आहे.
या शाहूचरित्राचे दुसरे एक विशेष म्हणजे हे एक समग्र शाहू चरित्र आहे. शाहू महाराजांच्या कार्याच्या सर्व पैलूंना लेखकाने स्पर्श केला आहे. शाहू महाराजांचे समग्र चरित्र समजून घेण्याच्या दृष्टीने या चरित्र ग्रंथाकडे पहावे लागेल. लेखकाने आपला ग्रंथ रचण्यासाठी अनेक शाहूचरित्रे, शाहू महाराजांची भाषणे, कायदे-कानून, पत्रव्यवहार, आठवणी इत्यादी साधन सामग्रीचा वापर करण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत. या पुस्तकास माझ्या मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रातील सुजाण वाचक या शाहूचरित्राचे स्वागत करतील याबद्दल शंका नाही.
– डॉ. जयसिंगराव पवार
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 332 |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Reviews
There are no reviews yet.