Additional information
लेखक | संदीप तापकीर |
---|---|
पृष्ठसंख्या | 136 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
मध्ययुगीन कालखंडातील भक्ती आंदोलनाचा स्वतंत्र पद्धतीने विचार करता येतो. ज्ञानदेव-नामदेवांच्या भोवती जो संतमेळा जमा झाला होता, तो विविध जाती स्तरातला होता. संत सेना हे त्यांच्यापैकीच एक होत. बहुजन समाजातील सत्वशील संतांच्या संघटना बांधणीचे श्रेय बहुतांश नामदेवानांच द्यावे लागते. तथापि भ्रमणशीलतेची परंपरा या कालखंडातील बहुतेक संतानी अंगिकारलेली दिसते. म्हणूनच साहित्याचे आंतरभारतीय पर्व या काळात ठळकपणे दिसून येते. भिन्न भाषेत लेखन करण्याची रीत त्यातूनच पुढे आली. सदविचारी माणसांचे संघटन उभे करण्यासाठी नामदेवांबरोबर हिंदी भाषिक परिसरातील संत सेना हेही एक होते, असे म्हणायला वाव आहे. मराठी आणि उत्तर भारतीय भाषांमध्ये त्यांनी वाङ्मय निर्मिती केलेली आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार समजून घेण्यासाठी संत सेनांच्या चरित्राचा, पारमार्थिक वाटचालीचा आणि एकंदरीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार डॉ. संदीप तापकीर यांनी शिस्तबद्ध पद्धतीने व समतोलपणाने या ग्रंथात केलेला आहे. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, विचारवंत, संतसाहित्याचे नवोदित अभ्यासक यांना हा ग्रंथ जसा मार्गदर्शक ठरतो, तसा तो सेनांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तभाविकांना व सांप्रदायिकांनाही उपयुक्त ठरतो. उपेक्षित समूहाच्या आवाजाला उजागर करण्याचा हा प्रयत्न संत सेनांच्या निमित्ताने करण्यात आला असला तरी अशा उपेक्षित संतांविषयीचे लेखन संशोधनास वाव असल्याचेही या ग्रंथातील विवेचनावरून ध्यानात येते.
– डॉ. सतीश बडवे
लेखक | संदीप तापकीर |
---|---|
पृष्ठसंख्या | 136 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.