Additional information
लेखक | स. गं. मालशे |
---|---|
संपादक | मिलिंद मालशे |
पृष्ठसंख्या | 68 |
बांधणी | पेपरबॅक |
₹100.00
संशोधनाच्या क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या अभ्यासकाला किंवा विद्यापीठीय पातळीवर प्रबंधलेखन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला उपयुक्त ठराव्या अशा ‘गोष्टी सांगेन युक्तिच्या चार’, ही भूमिका येथे स्वीकारलेली आहे. विषय कसा निवडावा? वाचन कसे करावे ? टिपणे कशी करावी? संदर्भ कसे द्यावे? संदर्भसूची कशी तयार करावी? संगणकाची मदत कशी घ्यावी? संशोधनाची मांडणी कशी करावी? या शंकांचे निरसन या पुस्तिकेत केलेले आहे..
संशोधनाचे अंतरंग हे त्या त्या व्यक्तीने ठरवायचे असते. परंतु सुनिश्चित असे बाह्य आडाखे माहिती करून घेण्यामुळे अनेक फायदे होतात. एक म्हणजे ‘मागच्याला ठेच, पुढचा शहाणा’, या उक्तीनुसार आधीच्यांनी केलेल्या चुका टाळता येतात, भरकटणे टाळता येते आणि वेळ वाचवता येतो. दुसरे म्हणजे संशोधनाची मांडणी ही इतर अभ्यासकांसमोर पोहोचविण्यासाठी काही किमान पातळीची संपर्कक्रिया आवश्यक असते. ही संपर्कक्रिया सुलभ व्हावी म्हणूनही संशोधनाच्या मांडणीचे तंत्र आत्मसात करून घ्यावे लागते. त्यासाठी हा प्रपंच.
१९७५ साली डॉ. स. गं. मालशे यांनी लिहिलेल्या व आता दुर्मीळ झालेल्या पुस्तकाची, आजच्या संगणकयुगातही वापरता येईल अशी सुधारित आवृत्ती.
लेखक | स. गं. मालशे |
---|---|
संपादक | मिलिंद मालशे |
पृष्ठसंख्या | 68 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.