Additional information
लेखक | वसंत आबाजी डहाके |
---|---|
पृष्ठसंख्या | 88 |
बांधणी | पेपरबॅक |
₹40.00
वसंत आबाजी डहाके यांच्या या कवितासंग्रहामागे एक सूत्र आहे. पिळवटून टाकणाऱ्या प्राक्कथेतून ते सुरुवातीला स्पष्ट होते आणि नंतर संग्रहातील शुनःशेपाच्या एकेका कवितेतून उलगडत जाते. ‘शुनःशेप’ हे एक अनेकार्थसूचक रूपक आहे. भोवतीच्या विकट वास्तवात पायाखालचे सगळेच आधार नाहीसे झालेल्या एका मानवी अस्तित्वाने पुन्हा एकदा कवितेलाच हाक घातली आहे. कवितेतून तो व्यक्त करतो आहे आपले प्राणभय, आपला आकांत, तडफड, उद्वेग आणि भ्रमनिरास. कवितेतूनच तो व्यक्त करतो आपल्या अस्तित्वाला असलेला कवितेचा आधार आणि आजच्या युगात कविता जुळणे आणि जगवणे किती कठीण. अशक्यप्राय होत चालले आहे, हेही. येथे ‘कविता’ ही संबंध अस्तित्व आणि जीवन व्यापून टाकणारी एक आदिबंधात्मक प्रतिमा बनते.
‘योगभ्रष्ट’ आणि ‘शुभवर्तमान या संग्रहातून स्पष्ट झालेली डहाक्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये ‘शुनःशेप मध्ये नव्या सामर्थ्याने प्रकटतात. जीवनाचा शोकात्म प्रत्यय देणारी ही कविता आतून प्रखरपणे राजकीय आहे. वर्तमान वास्तवाचे भयावह विरूप शब्दबद्ध करीत असताना ती त्यावरची प्रतिक्रियाही व्यक्त करते आणि त्यासंबंधी भाष्यही करते. या कवितेमागे सनातन जीवनमूल्यांचा आणि नैतिकतेचा आग्रह धरणारे एक संवेदनशील मन स्पंदन पावताना जाणवत राहते आणि ‘कविता’ या रूपबंधातून किती तरलपणे ते स्वतःला व्यक्त करीत राहते, हेही.
– प्रभा गणोरकर
लेखक | वसंत आबाजी डहाके |
---|---|
पृष्ठसंख्या | 88 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.