Additional information
लेखक | डॉ. मोनिका ठक्कर |
---|---|
पृष्ठसंख्या | 324 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
‘विदूषक – संकल्पना : स्वरूप’ हा मोनिका ठक्कर यांचा ग्रंथ नाट्यशास्त्र, लोक-नागर रंगभूमी आणि नाट्यकला समीक्षा या क्षेत्रात मौलिक भर टाकणारा ग्रंथ आहे. लोक- नागर रंगभूमीच्या संदर्भात ‘विदूषक’ या पात्राचा विचार फार कमी अभ्यासकांनी केला आहे. साठपूर्व काळातील गोविंद केशव भट यांच्या ग्रंथानंतर गत अर्धशतकात आधुनिक परिप्रेक्षातून ‘विदूषक’ या संकल्पनेचा गांभिर्याने अभ्यास फारसा कुणी केल्याचे दिसत नाही; ही उणीव या ग्रंथाने भरून निघत आहे. मोनिका ठक्कर यांनी प्राचीन काळापासून तर आजतागयतच्या प्रादर्शिक कला प्रकारातील विदूषक आणि विदूषक सदृष्य पात्रांचा अभ्यासपूर्ण धांडोळा घेऊन भारताच्या विविध प्रादेशिक लोककला प्रकारातील विदूषकाच्या बदलत्या स्वरूपाची यथोचित मांडणी प्रस्तुत ग्रंथात केल्याने अभ्यासकांची देखिल सोय झाली आहे. रासलीला, अंकियानाट, यक्षगान, भवाई, नौटंकी, जात्रा, कुडियाट्टम, खडीगंमत, तमाशा, दंढार यासारख्या लोककला प्रकारातील सोंगाड्या असो वा रामलीलेतील हनुमान असो; या पात्रांच्या नाट्यधर्मी प्रवृत्तीचा, लोकधर्मी विशेषांचा त्यांनी घेतलेला वेध त्यांच्या सखोल अभ्यासाचा प्रत्यय देणारा आहे.
लेखक | डॉ. मोनिका ठक्कर |
---|---|
पृष्ठसंख्या | 324 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.