Additional information
लेखक | ऍड. भगवानराव देशपांडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 164 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
नेहरूंचा वारसा म्हणजे नक्की काय? ज्या स्वातंत्र्य चळवळीने नेहरूंचे नेतृत्व आणि विचार विकसित केले त्या स्वातंत्र्य चळवळीचे व तिच्या मुद्द्यांचे आता महत्त्व काय? त्यांचे संदर्भ कोणते आहेत? भारताच्या राज्यघटनेत त्या स्वातंत्र्य चळवळीतील मूल्यांना काय स्थान आहे? भारत ही एक राष्ट्र-संकल्पना कशी उत्क्रांत होत गेली आहे? हे व असे अनेक प्रश्न या एकूण अर्वाचीन इतिहासात अनुस्यूत आहेत. परंतु सध्याच्या बहकलेल्या वैचारिक / सामाजिक-राजकीय वातावरणात ज्या सवंगपणे चर्चा होत आहेत त्या पाहता भारत हे एक सार्वभौम, सेक्युलर, उदारमतवादी, प्रगत लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्वतंत्र देशाची शताब्दी साजरी करू शकेल का असाच प्रश्न पडतो.
या प्रश्नांची मुळं गेल्या दोन-अडीचशे वर्षांत असली तरी अगदी जिवंत संकल्पनांचे आणि अर्वाचीन इतिहासाच्या वारसाचे अर्थ अन्वयार्थ उलगडणारे हे पुस्तक आहे.
भगवानराव देशपांडे हे फक्त व्यासंगी नाहीत तर स्वभावानेच सक्रिय विचारवंत किंवा अभ्यासू चळवळ्ये आहेत. वयाची नव्वदी समोर दिसत असतानाही त्यांनी अतिशय तडफेने सद्यःस्थितीवर निरुपण केले आहे.
हे पुस्तक राज्यशास्त्राचे विद्यार्थी आणि प्राध्यापक, पत्रकार आणि वैचारिक / सामाजिक- राजकीय चळवळीतील कार्यकर्ते अशा सर्वांना संदर्भ म्हणून उपयुक्त आहेच पण तितकेच विचारप्रवृत्त करणारेही आहे.
– कुमार केतकर
लेखक | ऍड. भगवानराव देशपांडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 164 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.