Additional information
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹160.00.₹140.00Current price is: ₹140.00.
वैचारिक / सामाजिक जीवनाचे समग्र भान आणि सखोल तत्वचिंतन यांच्याशी असणाऱ्या आंतरिक नात्यामुळे दि. के. बेडेकरांच्या साहित्यकलाविषयक लेखनाला एक आगळेच स्वरूप प्राप्त झालेले आहे. साहित्यविचार आणि साहित्य निर्मितीव समीक्षा या दोन इतक्याच महत्वाचा विचारमात्रा हा १९७५ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेला साहित्यकलाविषयक लेखांचा संग्रह आता पुन्हा प्रकाशित होत आहे. त्यातही त्यांच्या कला व साहित्य मीमांसेचे व समीक्षेचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पैलू प्रत्ययाला येतात.
दि. के. बेडेकरांचे विचारविश्व मार्क्सच्या तत्त्वदृष्टाने प्रभावित झालेले होते. ‘कलावंताचे स्वातंत्र्य’, ‘मराठी साहित्य समीक्षेवरील मार्क्सवादाचा परिणाम व “ख्रिस्टोफर कॉडवेलची साहित्य दृष्टी यांसारख्या त्यांच्या लेखांतून मार्क्सवादाचे मुळातले सर्जनशील, मुक्त आणि चिकित्सक रूप समोर येते. उलट कोणत्याही प्रकारच्या एकदेशीयतेला व ठोकळेबाजपणाला मार्क्सविचारात स्थान नाही याचे अत्यंतर त्यांच्या विचारयात्रेत सतत येत राहते.
या तात्विक चर्चेबरोबरच तत्कालीन मराठी साहित्यातील काही महत्त्वाच्या अंतःप्रवाहांचा वडामोडीचा परामर्श त्यांनी येथे घेतला आहे. ‘आजची मराठी कादंबरी’, ‘ऐतिहासिक कादंबरी काही विचार’ व ‘मुक्तिबोधांची त्रिदल कादंबरी’ या तीन लेखांमध्ये या वाङ्मयप्रकाराकडे बघण्याची एक नवी दृष्टी बेडेकरांनी समीक्षेला दिली आहे असे म्हणायला हरकत नाही. ‘साहित्यातील बीभत्स गारठा’ ह्या त्यांच्या खळबळ माजवणान्या प्रसिद्ध लेखात मराठी साहित्यविश्वाची आजही अस्तुत वाटेल अशी परखड चिकित्सा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर सहजपणे दलित साहित्यामागच्या विशाल माणुसकीची व कणखर विद्रोही जिद्दीची नोंद त्यांनी एका लेखात घेतली आहे.
प्रा. गं. बा. सरदार यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा लेखसंग्रहातील विचारांच्या मौलिकतेमुळे सर्वच साहित्यप्रेमी वाचकांना उद्बोधक होईल. विशेषतः दलित व श्रमिक समाजातील आणि मध्यमवर्गातील वाड्मयाभिरुची असणाऱ्या नवजागृत तरुणांना त्यामधून मोलाचे मार्गदर्शन मिळेल.भूत होईल अशी खात्री आहे.
लेखक | दि. के. बेडेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.