Additional information
संपादक | इंद्रजीत भालेराव |
---|---|
पृष्ठसंख्या | 208 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹225.00.₹200.00Current price is: ₹200.00.
बहुजन समाज या नावाखाली आपापल्याच जातीचं चित्रण करण्याच्या काळात लेखन करणारा कुठल्या जातीचा ते ओळखायला येऊ नये, इतक्या निरपेक्ष पद्धतीने मानवी जीवनातलं दुःख आपल्या लेखनातून मांडणारा एक सच्चा प्रतिभावंत अशी आगळी प्रतिमा भास्कर चंदनशिव यांनी निर्माण केली. आपल्या कवेत सर्व दुःखितांना सामावून घेण्याचा यशस्वी प्रयत्न चंदनशिव यांनी केला.
चंदनशिव यांची प्रत्येक कथा सत्यजित रे यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या चित्रपटाची आठवण देत राहते. ग्रामजीवनाची नेमकी नस सत्यजित रे आपल्या चित्रचौकटीत पकडतात तितक्याच कलात्मक ताकदीने चंदनशिव ग्रामवास्तवाचे तुकडे आपल्या कथेत मांडतात. आणि सजग माणसाच्या काळजाला ते जाऊन भिडल्याशिवाय राहत नाहीत. समाजवास्तवाची जाण आणि श्रेष्ठ दर्जाचा कलात्मक आनंद या दोन्ही गोष्टी चंदनशिव यांची कथा एकाच वेळी साध्य करते. भास्कर चंदनशिव यांच्या कथेचा समग्र पट डोळ्यांसमोर आणला तर लक्षात येईल की गेल्या पन्नास वर्षांतला एक गाव जिवंत होऊन आपल्या समोर उभा राहिलेला आहे. जणू एका गावाची ही महागाथाच आहे. या कथा आणि त्यांतली पात्रे वेगवेगळी असली तरी सर्वामधून उभा राहतो तो एक जिवंत गाव.
– इंद्रजित भालेराव ( प्रस्तावनेतून )
संपादक | इंद्रजीत भालेराव |
---|---|
पृष्ठसंख्या | 208 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.