Additional information
अनुवाद/भाषांतर | जयप्रकाश सावंत |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
त्रिवेदींच्या कथांमधली सगळी पात्रं, किंबहुना त्यांतला मध्यमवर्ग हा जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावरचा आहे. ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या मध्यमवर्गाचं हे चित्रण आहे. तोवर जपलेल्या नीतिमूल्यांना हादरे बसू लागण्याचा हा काळ. माणसाचं वस्तुकरण व्हायला सुरुवात झाल्याचा हा काळ. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ लागलं तो हा काळ. ह्या काळातल्या वैचारिक / सामाजिक घटनांच्या नोंदी या कथांमध्ये नाहीत, पण त्यातून आलेल्या भयाचं सावट मात्र कथांमधल्या पात्रांवर आहे. ह्या बहुतेक सगळ्याच कथांमधली पात्रं भय आणि कातरता घेऊनच जगतात. या संग्रहातल्या कथा इतक्या चिरेबंदपणे विशिष्ट काळातला समाज दाखवतात की तो दस्तावेज म्हणून बाटलीत भरून म्युझियममध्ये ठेवावा आणि नंतरच्या लोकांनी त्याचा अभ्यास करावा.
त्रिवेदींच्या कथांचा सूर विलक्षण समंजस, घीमा आणि हळुवार आहे. आपल्या जवळच्या मित्राने अतिशय खाजगी आवाजात खांद्यावर हात ठेवून आपल्या अंतरीचं गुपित उघड केल्याप्रमाणे जगण्याची कैफियत मांडावी, तशा या कथा आहेत. या कथांचे विषय झालेल्या माणसांची आयुष्यं त्यांना खोलवर माहीत असावीत इतक्या अचूकपणाने ते त्यांचे तपशील पुरवत जातात. त्या माणसांना ओरखडे पडणार नाहीत इतक्या मायेने ते त्यांच्याविषयी बोलतात. त्रिवेदींच्या या भावुकतेची, हळव्या मनाची आणि आंतरिक कळवळ्याची तुलना मराठीतल्या साने गुरुजींशीच होऊ शकते.
– जयंत पवार
अनुवाद/भाषांतर | जयप्रकाश सावंत |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Reviews
There are no reviews yet.