Additional information
लेखक | अशोक कौतिक कोळी |
---|---|
पृष्ठसंख्या | 124 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
शेतीप्रश्नकेंद्री कादंबरीस नवी इयत्ता प्राप्त करून देणाऱ्या अशोक कौतिक कोळी यांच्या ‘पाडा’, ‘कुंधा’ या कादंबरीमालेनंतरची ‘रक्ताळलेल्या तुरी’ ही नवी कादंबरी. कपाशी पिकविणारा शेतकरी शासनाच्या हमीभावामुळे तुरीचे पीक घेतो. पिवळ्याधम्मक फुलांच्या ‘जठी तठी’ तुरीच तुरी बहरून येतात. सारे कुटुंब आनंदते. या तुरीवर मुलीचे लग्न, मुलाची सायकल आणि हजार देणेदारांची नजर. गावातील बंडू शेठला कमी भावाने तूर न विकता तो सरकारी हमीभाव केंद्रात विकण्याचा प्रयत्न करतो. मात्र तिथेही त्याच्या पदरी प्रचंड निराशा येते. तूर पिकवून विकण्यापर्यंतच्या कालावकाशाची ही कहाणी एका शेतकरी कुटुंबाभोवती फिरते.
राजसंस्था, भांडवलशाही, व्यापारी आणि नोकरशाही एकत्र मिळून शेतकऱ्यांचे पराकोटीचे शोषण करतात असे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले होते. या विचारांचा गडद आणि शोकान्त प्रत्यय देणारी ही कादंबरी. समकालीन शेतीप्रश्नाची मांडणी करणाऱ्या या कादंबरीस दशकातील घडामोडींनी आकार प्राप्त करून दिला आहे. शेती प्रश्नांच्या अनेक मिती तीमधून दर्शविल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जगण्यातील अशाश्वतता आणि राज्यसंस्थेच्या ‘मन की बात’चे भ्रामक स्वप्नसंमोहनगारूड या अंतर्विरोधातील शेतकऱ्याच्या हतबलतेचे अत्यंत हृदयभेदक चित्र कादंबरीत आहे. लालजरद तुरीच्या रक्ताच्या चिरकांड्या चौखूर उसळणाऱ्या शेतीसमाजाची ही अस्वस्थ करणारी यातनाकहाणी आहे. शेतीपरंपरेतील म्हणी वाक्प्रचारांचा सर्जनशील वापर तसेच तावडी बोली संवादरूपाच्या वापराने कादंबरीला वैशिष्ट्यपूर्णता प्राप्त झाली आहे. गुंतागुंतीच्या शेती अर्थसमाजशास्त्रास जबाबदार व्यवस्था आणि त्याला बळी पडत असलेल्या कृषक समाजाची ही शोकान्त कहाणी आहे.
– रणधीर शिंदे
लेखक | अशोक कौतिक कोळी |
---|---|
पृष्ठसंख्या | 124 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.