Description
बालिकाच्या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने मराठी साहित्यात प्रथम एका वर्दीधारक महिलेची कविता येत आहे. तिचं स्वागत करायला हवं. व्यवस्था आणि व्यवस्थे बाहेरील वेदनांचा हिशेब ती मांडते. या वेदनांना धारदार हत्याराचं स्वरुप देऊन ती रणमैदानावर उतरते आहे. माणसांची व्यवस्था आणि माणसांनी बनवलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थेतून जन्माला आलेल्या विषमता हे बालिकाचे टार्गेट आहे. ‘आऊटरवर’ नव्हे तर ‘बुल’ मध्येच शिरतेय तिच्या मॅगझीनमधून सुटलेली गोळी.
– उत्तम कांबळे
Reviews
There are no reviews yet.