Additional information
लेखक | वंदना सोनाळकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 164 |
अनुवाद / भाषांतर | शेखर देशमुख |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Original price was: ₹280.00.₹250.00Current price is: ₹250.00.
वंदना सोनाळकर या स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाद्वारे त्यांनी राजकीय हिंदुत्व आणि व्यापक हिंदू धर्म या दोहोंची चिकित्सा करताना एक स्त्री, त्यातही महाराष्ट्रातील उच्चजातीय स्त्री म्हणून जन्माला येऊनसुद्धा स्वतःची धार्मिक ओळख आपण का नाकारली, याची तर्कसंगत अशी मांडणीही केली आहे.
वैयक्तिक अनुभव तसेच लिखित आणि अनुभवजन्य पुराव्याआधारे त्यांनी या पुस्तकात जातकेंद्री परंपरा आणि व्यवहारांचे समीप दर्शन घडवले आहे. तसे ते घडवताना पुसरुषसत्ताक व्यवस्था आणि ब्राह्मणवाद हे हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मते, ही व्यवस्था आणि त्याआधारे प्रभाव राखत आलेला ब्राह्मणवादी धर्म मुळातूनच जातभेदी आणि स्त्रीद्वेष्टा राहिला आहे. ब्राह्मणवादी धर्माने लादलेले नियम आणि आज्ञा या दोन्ही गोष्टी प्रथा-परंपरांचे पालन करण्याकामी तसेच राजकीय हिंदुत्वाच्या विस्तारासाठी आवश्यक ठरत आले आहेत. याच रुढीकेंद्री रिवाजांचे पुढे जाऊन मुस्लिमांवरही आक्रमण होत आले आहे.
वंदना सोनाळकर या पुस्तकाद्वारे हेदेखील जोरकसपणे सांगितले आहे की, भेदभाव आणि विषमता ही दोन वैगुण्ये हिंदू धर्मात अशा रीतीने आत्मसात झालेली आहेत, ज्यायोगे दैनंदिन परस्परव्यव्हारात या वैगुण्यांचे नकळत पालनही होत आले आहे आणि त्यास मान्यता मिळून ही वैगुण्ये समाजात खोलवर मुरलेलीसुद्धा आहेत.
लेखक | वंदना सोनाळकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 164 |
अनुवाद / भाषांतर | शेखर देशमुख |
बांधणी | पेपरबॅक । गेटफोल्ड |
Reviews
There are no reviews yet.