Additional information
लेखक | |
---|---|
शब्दांकन | दमयंती पाटील |
पृष्ठसंख्या | 120 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
हौसाताई पाटील या कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या. क्रांतिसिंहांच्या नेतृत्वात हौसाताईंनीदेखील प्रतिसरकारच्या आंदोलनात व स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हौसाताई पाटील लढल्या. त्यांचे वडील क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रतिसरकारचे प्रमुख होते.
भूमिगत कारवायांमध्ये हौसाताईंचं मुख्य काम असायचं माहिती गोळा करण्याचं. वयाच्या विशीत त्या काळी एखाद्या महिलेने अशा पद्धतीने काम करणं हे खरोखर क्रांतिकारी होतं. हैद्राबाद मुक्तिसंग्राम आणि गोवा मुक्तिसंग्रामातदेखील हौसाताईंनी योगदान दिले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी मोलाची भूमिका निभावली. हौसाताई पाटील यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा अत्यंत हालअपेष्टा सोसत जगण्याला खरा अर्थ प्राप्त करून देणारा आहे. नवीन पिढीसमोर त्यांचे संपूर्ण संघर्षमय जीवन हे विस्ताराने येणे गरजेचे होते. त्यांची नात दमयंती पाटील यांनी शब्दांकित केलेले त्यांचे आत्मचरित्र हे नव्या पिढीसाठी खरोखर प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास वाटतो..
– पी. साईनाथ
लेखक | |
---|---|
शब्दांकन | दमयंती पाटील |
पृष्ठसंख्या | 120 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.