Additional information
लेखक | बा. रं. सुंठणकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 180 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
संतांच्या भागवत संप्रदायाचा प्रसार महाराष्ट्रात चोहीकडे झालेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आणि झोपड्याझोपड्यांतून संतांची कवने आजही दुमदुमत असतात. जेथे जेथे म्हणून मराठी भाषा बोलली जाते, तेथे तेथे संतांचे अभंग अद्यापही ऐकू येतात. दूरदूरच्या प्रदेशांतून पंढरपूरला दिंड्यांची आणि वारकऱ्यांची गर्दी हल्लीही लोटत असते. पाच-सहा शतके लोटली तरीही संतांच्या संप्रदायाची बहुजन समाजावरील पकड ढिली झालेली नाही. महाराष्ट्रीय संतांची परंपरा ही ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत विशेष तेजस्वी स्वरूपात आढळते… नामदेवांच्या भक्तीतील उत्कटता आणि तळमळ; एकनाथांची मानवजातीबद्दलचीच नव्हे तर अखिल प्राणिमात्रांसंबंधीची उदात्त समभावना आणि अंतरीची कळकळ; तुकारामांचा भक्तिभावाने ओथंबलेला अंतःकरणाचा जिव्हाळा आणि आत्मप्रत्यय हे पुढच्या संतांत आढळून येत नाही. पुढच्या संतांनी संत संप्रदाय चालू ठेवला. त्यात मौलिक भर घातली नाही.
लेखक | बा. रं. सुंठणकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 180 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.