Additional information
लेखक | जगन फडणीस |
---|---|
पाने | १४० |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
महात्मा गांधी २५ जून १९३४ रोजी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर बॉम्ब टाकण्यात आला. २५ जून १९३४ रोजी फाळणी झाली होती? त्या वेळी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा प्रश्न निर्माण झाला होता? मग महात्मा गांधींच्या खुनाचा प्रयत्न पुण्यातच का व्हावा?
सप्टेंबर १९४४ मध्ये महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमातून रेल्वेने मुंबईला निघाले असता आश्रमाच्या बाहेर हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींना धक्काबुक्की केली. त्या वेळी पोलिसांनी नथुराम गोडसे व ल. ग. थत्ते यांच्याकडून जांबिया जप्त केला. हा प्रयत्न झाला तेव्हा फाळणी झाली होती? ५५ कोटी पाकिस्तानला देण्याचा प्रश्न आला होता? नाही! मग हा प्रयत्न कशासाठी होता?
“रा. स्व. संघ व हिंदू महासभा विशेषतः संघाच्या कारवाया आणि त्याने देशभर निर्माण केलेल्या वातावरणामुळेच महात्मा गांधींच्या खुनाची भयानक घटना घडली, असे आमचे अहवाल सांगतात. गांधींच्या खुनाच्या कटात हिंदू महासभेच्या भडक विचारांचा गट सामील झाला आहे, याविषयी माझ्या मनात तिळमात्रही संशय नाही. रा. स्व. संघाच्या कारवायांमुळे देश व सरकार यांनाच धोका निर्माण झाला आहे.” असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. (सरदार पटेल्स कॉरस्पॉण्डन्स, खंड ६, पृष्ठ ३२३)
“संघाच्या नेत्यांची भाषणे जातिवादाच्या विखाराने भरलेली आहेत. संघाच्या विखारानेच महात्मा गांधींची हत्या झाली. गांधींच्या खुनाबद्दल संघाच्या लोकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे.” असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरसंघसंचालक गोळवलकर गुरुजी यांना ११ सप्टेंबर १९४८ रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
Reviews
There are no reviews yet.