Additional information
संपादन | डॉ वंदना महाजन । डॉ. अनिल सपकाळ |
---|---|
पाने | ६०० |
बांधणी | हार्डकव्हर |
ISBN | 978-93-93134-90-5 |
Original price was: ₹700.00.₹560.00Current price is: ₹560.00.
‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ हा जातवर्गस्त्रीदास्यांत घडवू पाहणाऱ्या महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञान आणि विचारांच्या प्रभावांचे पुनर्वाचन करणारा संपादित ग्रंथ आहे. महात्मा फुले हे भारतीय अब्राह्मणी अवैदिक परंपरेची चिकित्सापद्धती वसाहतवादी काळातील आधुनिक ज्ञानशाखांशी जोडून नवमीमांसापद्धती दृढ करतात. वर्णाश्रमधर्मातील जातीय विषमतेविरुद्ध आपला विचार दृग्गोचर करून सकल मानवीमूल्यांची पुनर्माडणी करतात. ते स्त्री-शूद्रांच्या मानवी अधिकारांचा पाठपुरावा करतात. आधुनिक नाटक, गद्य लेखन, प्राचीन संवादपद्धती, पवाडे, कथनांचा आविष्कार तंत्र म्हणून ते स्वीकार करतात. नव समाजाची संरचना निर्माण करणारे फुलेवादी प्रभाव फुलेत्तोर काळावर निरंतर राहिले आहेत. या वाटचालीचा घेतलेला धांडोळा म्हणजे प्रस्तुतचे संपादन आहे. हा ग्रंथ तीन भागांत विभागला आहे. यात महात्मा फुले यांच्या ज्ञाननिर्मितीच्या सिद्धांतनाचे विविध अवकाश उलगडून दाखवले आहेत. फुलेनिर्मित साहित्याचे पुनर्वाचन केले आहे. तसेच आधुनिक मराठी साहित्यावरील फुले यांच्या विचारांच्या प्रभावांची चर्चा केली आहे. ही चर्चा अभ्यासविषयक नवी वाट निर्माण करण्यास उपयुक्त ठरते.
महात्मा फुले यांच्या धार्मिक, आर्थिक, स्त्री पुरुषांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक समतेच्या विचारव्यूहाबरोबर, ज्ञानाच्या हस्तक्षेपातील प्रभावासंदर्भातील सैद्धान्तिक मांडणी या ग्रंथात आलेली आहे. या ग्रंथातून फुलेवादी चिकित्सा, विश्लेषण, मूल्यमापनपद्धती उजागर होते. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या तथागत बुद्ध ते आधुनिक काळातील फुले-आंबेडकर यांच्या प्रागतिक मूल्यदृष्टीच्या चर्चाविश्वाचे अवकाश या संपादनामुळे विस्तारतात.
– डॉ. अनिल सपकाळ
संपादन | डॉ वंदना महाजन । डॉ. अनिल सपकाळ |
---|---|
पाने | ६०० |
बांधणी | हार्डकव्हर |
ISBN | 978-93-93134-90-5 |
Reviews
There are no reviews yet.