लोकवाङमय गृह

Shop

मम म्हणा फक्त । वीरधवल परब

Original price was: ₹150.00.Current price is: ₹135.00.

मी गोंधळून गेलोय या संधिकाळाच्या/ उखळी सांध्यावर/ मला भीती वाटतेय की, एका तरी माणसावर / विश्वास ठेवता येईल की नाही/निदान स्वतःचा स्वतःला तरी भरवसा देता येईल की नाही? (‘तर आता या निर्णायक क्षणी’) आणि कवीला तर लिहावंच लागतं। अवतीभवतीच्या लखलखीत प्रकाशातील क्रूरतेविषयी / बेछूट धावणाऱ्या वर्दळीविषयी/ द्विधेच्या कुंपणावर बसलेल्या कार्यकर्त्यांविषयी (‘कविता लिहिली गेली नाही तर…? )
वीरधवलची कविता या दोन ताणांची क्रूर साक्षीदार म्हणून आपल्यासमोर आहे. वीरधवलच्या २००६ सालातल्या दर साल दर शेकडा या कवितासंग्रहानंतर आता हा त्याचा नवा संग्रह मम म्हणा फक्त आपल्यासमोर येत आहे. मधल्या काळात हा देश आणि आपला भोवताल खूप बदलला आहे. नवी आव्हाने अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. त्याबरोबर कवीची भवतालाविषयीची समज आणि कवीचा समजूतदारपणाही अधिकच मानवी होत कवितेतून व्यक्त झाला आहे.
‘कविताच असते एकमेव विश्वासार्ह ही भूमिका आकलनाच्या परिघात आणणाऱ्या या कवीच्या कविता आता भवतालाला तपासत आहेतच आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःलाही तपासण्याचा आग्रह धरत आहेत. आपल्या जागल्याच्या भूमिकेतून आता स्वतःवरच नजर ठेवण्याच्या या काळाची गरज म्हणून या संग्रहात कवितेवर बोलण्याचे प्रमाणही वाढले आहे..
कवितेचे कार्य आणि कवीची जबाबदारी यांत वैयक्तिक आयुष्य आणि समष्टीचा कळवळा त्याला आतूनच पोखरत आहे. खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य यांतली भेदरेषा पूर्णतः मिटवून त्यातून एकरस वर्तमान निर्माण होण्याची अद्भुत किमया या कवितेत घडली आहे..
आजच्या एकूण मराठी कवितेची पार्श्वभूमी त्याला आहेच, पण त्याची कवितेची दीर्घ लय पेलायची ताकद अन्य महत्त्वाच्या भारतीय कवींच्या कवितेला दिलेला प्रतिसाद आहे. वाद-प्रतिवाद आणि अंततः संवादाला सामोरी होणारी ही कविता या काळात खूप गरजेची आणि महत्त्वपूर्ण आहे.
त्याच्या या नव्या कवितासंग्रहाला आणि त्याच्या इतक्याच अंतरीच्या उमाळ्याने लिहिणाऱ्या त्याच्या सोबतच्या अन्य मराठी कवींना आणि कवितेला अभिवादन करतानाचा आनंद माझ्यासाठी मोठा आहे. कारण माझी समज आहे, की १९६० नंतरच्या साहित्य, संस्कृती, समाज आणि राजकारण यांतल्या उठावानंतरची संयत भूमिका आता पुढल्या टप्प्यावर आली आहे. मम म्हणा फक्तची कविता याचा प्रत्यय देते.
– सतीश काळसेकर

Additional information

लेखक

वीरधवल परब

पृष्ठसंख्या

112

बांधणी

पेपरबॅक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मम म्हणा फक्त । वीरधवल परब”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com
× WhatsApp Us