Additional information
लेखक | मनोहर ओक |
---|---|
संपादक | चंद्रकान्त पाटील, तुळसी परब |
पृष्ठसंख्या | 126 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
मनोहरनं उभ्या आयुष्यात कधीही तडजोडी केल्या नाहीत, बंधनं मानली नाहीत. नातीगोती, घरसंसार, आत्मीय-दूरस्थ अशा कसल्याही बंधनात स्वतःला गुरफटून घेतलं नाही. भावनेमुळेच गुंतवणूक होते, म्हणून भावनाविरहित व्हायचा, किमान कवितेबाहेर व्यावहारिक जगात भावनाविरहित व्हायचा कायमच प्रयत्न केला. कवितेतच जगणं थाटणाऱ्या मनोहरनं प्रस्थापित कवितेचाही चेहरामोहरा बुद्धिपुरस्सर टाळला, आणि आपल्याच अटींवर कविता लिहिल्या. त्यात मग अराजकता वा अव्यवस्थितपणा आला तरी प्रकृती म्हणूनच ते पाळलं. एखादी कविता आकार घेऊ लागल्यावर ती व्यवस्थित करावी असं काही मनोहरला कधी वाटायचं नाही. एखादा बांध फुटून खळाळून पाणी वाहावं, त्यात पानं-फांद्या, दगड-माती, केरकचरा असं सगळं काही वाहवत जावं, तसे अनेकदा मनोहरच्या कवितेतून शब्द खळाळत जायचे, एकमेकांवर आदळून आपटून वाहत जायचे, मूळ अनुभवालाच तळाशी बुडवून टाकायचे.
लेखक | मनोहर ओक |
---|---|
संपादक | चंद्रकान्त पाटील, तुळसी परब |
पृष्ठसंख्या | 126 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.