Additional information
लेखक | प्रा. कु. ल. महाले |
---|---|
पाने | २७६ |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
संघस्थानावर इतर ‘बौद्धिके’ होत त्याला संघात ‘इतिहास’ हे संबोधन होते. आणि प्रभातशाखा, सायंशाखा, बालशाखा यात वयोगटाचा विचार न होता सतत जो ‘इतिहास’ शिकविला जाई त्याचे स्वरूप मध्ययुगीन ‘रासो’ सारखे वीरगाथा असे होते. या कथा ठरलेल्या होत्या, अनेक वर्षे, वेळीप्रसंगी त्याच त्याच कथा सांगितल्या जात म्हणून स्वयंसेवकांच्या मनावर ठसलेला इतिहास ठरावीक होता. पृथ्वीराज महंमद घोरीशी लढताना हारला कारण जयचंदाची फितुरी पण शेवटी दोन्ही डोळे काढलेल्या पृथ्वीराजाने शब्दवेधी बाणाने घोरीचा वध केला, राणाप्रताप हळदीघाटची लढाई, राणा प्रताप हारला कारण मानासिंग व त्याचा स्वतःचा भाऊ, हळदीघाट ही संघाची विशेष प्रेरणा होती. कल्याणच्या सुभेदाराची लावण्यवती सून चारित्र्यवान शिवाजी बिदागी देऊन परत करतो, “आमच्या माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही पण तितकेच सुंदर झालो असतो.” शिवाजी रामदासाच्यां झोळीत आपले राज्य टाकतो व रामदासाचा प्रसाद म्हणून ते रामदासचरणी नतमस्तक होऊन स्वीकारतो, गुरु गोविंद सिंगाचे पाच खालसा आपली शिरे उडवून घेण्यासाठी एकामागून एक जात आहेत, संघाचा हा इतिहास कथात्मक रीतीने ‘बौद्धिका’त शिकविला जात असे. संघाने पुरातन परंपरा स्वीकारली, ती पौराणिक कथांची परंपरा म्हणून. दंतकथा संघाचा ‘इतिहास’ झाला. बिचाऱ्या स्वयंसेवकांना हाच इतिहास आहे असे वाटते.
संघाचा स्वयंसेवक चकित असायचा. कल्पना करा कांचेचे चिमुकले भिंग घेतले, त्याला निमुळते, निमुळते होत जाणारे छिद्र पाडले, त्यातून जे दृश्य दिसेल ते खूप खूप गुणाकृत करून छायाचित्रित केले तर ते दृश्य तेजोमेघांकित (Nebulous) असेल, त्याला वलय असेल, आकार असणार नाही. विचारांच्या बाबतीत संघाच्या सर्वसामान्य स्वयंसेवकांची वृत्ती प्रति- अभिवैज्ञानिक यामुळे बनते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात लाखो तरुण राबले, अद्याप राबत आहेत, ते देशशत्रू नव्हते, पण त्यांच्या मनात ज्वाला होती ‘प्रबळ हिंदू ऐक्य देशाला वाचवील.’ ते भोळे होते, त्यांच्या मनात आकांक्षा होत्या. या बिचाऱ्यांना दंतकथांवर झुलवीत ठेवण्यात आले. त्यांची अभ्यासमय तत्त्वचिंतनापासून कायमची फारकत झाली. वस्तुस्थिती रूपकात्मक भाषेत मांडायची झाली तर म्हणता येईल की त्यांच्या मेंदूंची मृगया झाली !
लेखक | प्रा. कु. ल. महाले |
---|---|
पाने | २७६ |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.