लोकवाङमय गृह

Shop

भारतीय नजरेतून लेनिन । के. पी. एस. मेनन\संजय चिटणीस

Original price was: ₹120.00.Current price is: ₹100.00.

के. पी. एस. मेनन हे भारताचे परराष्ट्र सचिव होतेच, पण त्यांची खरी ओळख होती ती तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये भारताचे राजदूत या नात्याने त्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे. सोव्हिएत युनियनमध्ये मेनन दहा वर्षे भारताचे राजदूत होते. त्या वेळी त्यांनी अतिशय जवळून सोव्हिएत युनियनमधील राजकीय व समाजव्यवस्थेचे तसेच सांस्कृतिक जीवनाचे जे निरीक्षण केले त्याचा प्रत्यय त्यांच्या ‘लेनिन थ्रू इंडियन आईज’ या पुस्तकात येतो. हीच गोष्ट लेनिन यांच्याबद्दल आहे. एक उदाहरण देतोः “… मार्क्सच्या लिखाणाचा लेनिन यांच्यावर असाच परिणाम झाला. राजकीय रंगभूमीवर लेनिन यांचे आगमन होईपर्यंत कार्ल मार्क्सचे त्यांच्या ‘कॅपिटल’मध्ये दफन झाले होते. मार्क्सच्या मते त्यांचे पुस्तक (वास्तवात हा ग्रंथ आहे) हे मध्यमवर्गीय विचारसरणीवर (Bourgeoisie) फेकलेले भयंकर अस्त्र होते आणि तरीही मार्क्सच्या गर्जनेमुळे बेचैन न होता मध्यमवर्गीयांचे जीवन मजेत चालले होते. रशियातील सेन्सॉर बोर्डाने जेव्हा वॉल्टेअर यांच्या लिखाणाप्रमाणेच मार्क्सच्या ग्रंथावरही बंदी घालायला हवी, असे सुचविले तेव्हा झारने हरकत घेतली. झारचे म्हणणे होते की, ‘कॅपिटल’ हा ग्रंथ इतका क्लिष्ट आहे की, सामान्य माणसाला त्याचे आकर्षण वाटणार नाही. अखेर मार्क्सचे पुनरुज्जीवन करून केवळ रशियातीलच नव्हे तर अन्य ठिकाणांच्या सामान्य माणसाचे ते ‘बायबल’ करण्याची जबाबदारी लेनिन यांच्यावर पडली.के. पी. एस. मेनन यांची विचार करण्याची पद्धत व लिखाणाची शैली कशी होती याची ही एक झलक आहे. हे पुस्तक राज्यशास्त्राचे अभ्यासक व आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.

Additional information

लेखक

के. पी. एस. मेनन

भाषांतर

संजय चिटणीस

पृष्ठे

63

बांधणी

Paperback

ISBN

978-81-998771-6-0

मुखपृष्ठ

सरदार जाधव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय नजरेतून लेनिन । के. पी. एस. मेनन\संजय चिटणीस”

Your email address will not be published. Required fields are marked *

भूपेश गुप्ता भवन, ८५ सयानी रोड , लेनिनग्राड चौक, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ 022-24362474 | 8454049036 lokvangmayagriha@gmail.com