Additional information
लेखक | एस. जी. सरदेसाई |
---|---|
पृष्ठसंख्या | 106 |
बांधणी | पेपरबॅक |
₹100.00
विचार ही समाजजीवनातील एक अत्यंत प्रभावी शक्ती आहे. पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांनी कष्टकरी समाजाची एकजूट भक्कम होते, क्रांतिकारी चळवळीचे मार्गदर्शन होते. प्रतिगामी विचारधारांनी चळवळीची दिशाभूल होते, जनतेत फूट पडते, ज्यांनी बंधुभावाने एकवटून अन्याय आणि शोषण यांच्याविरुद्ध लढले पाहिजे; त्यांच्यातच तंटेबखेडे निर्माण होतात. अशा रीतीने जनतेची दिशाभूल करून तिच्यात फूट पाडण्याची जी अनेक वैचारिक साधने आहेत, त्यातील धर्मांधता हे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आज हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन या सर्व धर्मांचा दुरुपयोग याच हेतूने प्रचंड प्रमाणावर केला जात आहे. हिंदू धर्माभिमानाच्या नावाखाली गूढवाद, देवभोळेपणा, दैववाद, तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टीला विरोध यांना चालना दिली जात आहे. इतकेच नव्हे, तर जातिभेद आणि जातीयवाद यांना खतपाणी घातले जात आहे. यासाठी भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेचाही उपयोग केला जातो. त्या परंपरेला विकृत स्वरूप दिले जाते. या परंपरेत ज्या विचारधारा पुरोगामी आणि जनताभिमुख होत्या त्यांची बदनामी केली जाते आणि ज्या परंपरा जनताविरोधी आणि प्रतिगामी होत्या, त्यांचा उदो उदो केला जातो. या सर्व प्रश्नांवर थोडक्यात आणि सोप्या रीतीने प्रकाश टाकणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. सामान्य वाचकांच्या आणि जन-आंदोलनात काम करणाऱ्या कार्यकत्यांच्या हातात एक वैचारिक शस्त्र देण्याचा हा प्रयत्न आहे. आजच्या देशातील परिस्थितीत त्याची फार गरज आहे.
लेखक | एस. जी. सरदेसाई |
---|---|
पृष्ठसंख्या | 106 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.