Additional information
लेखक | उमेश बगाडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 136 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹170.00.₹145.00Current price is: ₹145.00.
स्त्रीशोषणाच्या वर्तमानातील गुंतागुंतीची संगती लावायची असेल तर स्त्रीशोषणाचा भारतीय,जातीय इतिहास तपासणे आवश्यक आहे. खासगी मालमत्तेच्या उगमातून स्त्रीदास्याचा जन्म झाला, ही मार्क्सवादी मांडणी किंवा स्त्री आणि पुरुष या दोन लिंगांमधला आदिम संघर्ष हा पहिला वर्गसंघर्ष आहे, ही जहाल स्त्रीवादी मांडणी किंवा समान हक्कांच्या परिभाषेत सामावलेली उदारमतवादी स्त्रीवादी मांडणी भारतीय स्त्री-दास्याची उतरंड समजू घ्यायला पुरेशी ठरत नाही. त्यासाठी ब्राह्मणी पितृसत्तेचा विचारव्यूह,त्यातील शोषणशासन यंत्रणा,त्यांना असलेले धर्मशास्त्रांचे आधार या सगळ्या किल्ल्यांचे उत्खनन करावे लागते. या पायऱ्यापायऱ्यांत गाडले गेलेले स्त्री-दास्य उलगडावे लागते. या पुस्तकातील उमेश बगाडे यांचे तिन्ही लेख हे उत्खनन करतात आणि म्हणूनच ते महत्त्वाचे आहेत. एक महत्त्वाचे स्त्रीवादी सिद्धांतन ते करत आहेत. अब्राह्मणी विचारविश्वातील दलित-बहुजनवादी स्त्रीवादासाठी हा लेखसंग्रह म्हणजे एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.
– संध्या नरे-पवार
लेखक | उमेश बगाडे |
---|---|
पृष्ठसंख्या | 136 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.