Additional information
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 72 |
बांधणी | पेपरबॅक |
₹100.00
तत्कालीन हैदराबाद राज्यातील परिस्थिती, शिक्षण संस्था, त्या संस्थांमधील माणसे कशी होती? हैदराबाद हा निजामाचा गड असूनही तिथे कामगार, श्रमिक यांच्या चळवळी कशा सुरू झाल्या आणि वाढल्या? यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत होती? या सगळ्यांना हिंदू आणि मुस्लिम या दोन चष्म्यातून आज पाहिले जाते. पण ते खरेच तसे आहे का ? ॲड. भगवानराव देशपांडे यांच्या जीवनातील संघर्षात त्यांना धार्मिक संघर्ष करावा लागला का ? किंवा हैदराबाद राज्य असताना संघर्षांचे कारण लोकशाही व्यवस्था विरुद्ध एकाधिकारशाही होती की हिंदू-मुस्लिम होती ? अशा अनेक बाबींचा उलगडा ॲड. भगवानराव देशपांडे यांच्या जीवनाला समजून घेताना होतो. हैदराबाद मुक्तीसंग्राम, मराठवाडा आणि आपला सीमा भाग याविषयीचे अनेक भ्रम दूर होतात. या लेखनाचा उद्देश ॲड. भगवानराव यांच्या जीवनाची गोष्ट सांगणे हा आहे. मात्र त्या ओघात मराठवाड्याची सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती काय होती हेदेखील लक्षात येते. या निमित्ताने अनेक भ्रम दूर होतील.
यासाठी हे पुस्तक नव्या पिढीने जरूर वाचावे असे वाटते. कॉम्रेड ॲड. भगवानराव देशपांडे यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
– तृप्ती डिग्गीकर
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 72 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.