Additional information
लेखक | जयंत पवार |
---|---|
पृष्ठसंख्या | 180 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहात एकूण सात कथा आहेत. त्यातल्या बहुतेक कथांना पार्श्वभूमी आहे ती या मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची. पवारांच्या या कथा व्यक्तिकेंदी नाहीत तर समूहकेंदी आहेत. अगदी ‘टेंगशेच्या स्वप्नातील ट्रेन’ या कथेतही टेंगशे या व्यक्तीभोवती ही कथा फिरत असली तरी ती ट्रेनमधील प्रवासी, त्यांची मानसिकता, बलात्कारासारख्या घटनेकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन यावर फोकस करते. ‘साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमुचे सुरू’ आणि ‘एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास’ या कथा तर चाळसंस्कृती, तिथं रहाणार्या विविध जातीय आणि वगीर्य स्तरातील लोकांची मानसिकता याविषयीच बोलते.
लेखक | जयंत पवार |
---|---|
पृष्ठसंख्या | 180 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.