Additional information
लेखक | जयदेव डोळे |
---|---|
पाने | १६४ |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
सध्या महाविद्यालये आणि विद्यापीठे विचारस्वातंत्र्याची कदर करणे साफ विसरून गेली आहेत. वाढलेल्या प्रचंड पगारामुळे कित्येक प्राध्यापक आपले विचारस्वातंत्र्य वापरतच नाहीत. मुंबई विद्यापीठात प्रा. नीरज हातेकर यांनी कुलगुरू आणि त्यांचे प्रशासन यांवर घाव घालताच त्यांचे निलंबनच केले गेले. नंतर वृत्तपत्रे, टीव्ही आणि प्राध्यापकांच्या संघटना यांनी हरकत घेतल्याने ते मागे घेतले गेले. मुंबईच नव्हे, महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठे आणि महाविद्यालये सुमार आणि व्यवस्थापकीय वृत्तीच्या लोकांच्या हातात गेली आहेत.
आजकालच्या ‘बहुजनाय’ वातावरणाचा तर असे सुमार प्राध्यापक मोठा लाभ करवून घेतात आणि बहुजन विद्यार्थ्यांचेच जबर नुकसान करून ठेवतात. बहुसंख्या त्यांचीच असल्याने दोष त्यांचेच दिसणार हे उघड आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांनी ज्या पोटभरू, स्वार्थी, ऐतखाऊ, शोषक ब्राह्मणांवर झोड उठवली, अगदी तसेच ब्राह्मणी हे बहुजन प्राध्यापक वागू लागले आहेत. पोथ्यापुराणे आणि वेदप्रामाण्य याप्रमाणे त्यांची विद्वत्ता पाठ्यपुस्तकांपलीकडे जात नाही. प्रस्थापित समाजव्यवस्थेचे आणि राजकारणाचे ते कडवे पाठीराखे असतात. म्हणूनच महाराष्ट्राचे उच्च शैक्षणिक वातावरण गोठलेले, कदमताल करणारे आणि निर्जीव झाले आहे. ग्रामीण भागात तर ‘भयंकर बीभत्स गारठा’ झोंबत असतो.
हा गारठा निघून जावा, वैचारिक मंथनामधून उष्णता यावी आणि महाराष्ट्र खरा पुरोगामी व्हावा हीच सदिच्छा व सद्हेतू या लिखाणाला आहे. त्याने कोणी चिडले, संतापले, खंतावले तर ते हवेच आहे.
– जयदेव डोळे
Reviews
There are no reviews yet.