Additional information
लेखक | दामोदर धर्मानंद कोसंबी |
---|---|
अनुवाद | वसंत तुळपुळे |
पृष्ठसंख्या | 238 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
महान इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या ‘मिथ अॅण्ड रिअॅलिटी’ या इंग्रजी ग्रंथाचा हा मराठी अनुवाद आहे. प्राचीन भारताच्या काही ऐतिहासिक तथ्यांचा शोध या ग्रंथातून कोसंबी यांनी घेतला आहे. ‘उत्खननातील पुरावे आणि वाङ्मयीन पुरावे यांची सांगड घालून’ घेतलेला हा शोध पुराणांमधील वास्तव शोधण्याचा महत्त्वाचा प्रयोग ठरला आहे. प्राचीन भारतीय वाङ्मय, स्थानमाहात्म्ये, लोकसमजुती, रूढी-परंपरा यांमध्ये जागोजागी दडलेल्या ऐतिहासिक वस्तुस्थितींना आवश्यक तेथे पुरातत्त्वीय जोड देऊन लिहिलेला हा इतिहास आहे आणि या इतिहासलेखनाच्या मुळाशी आहे कोसंबी यांची भेदक अशी भौतिकवादी इतिहासदृष्टी. त्यामुळेच मराठीतील इतिहासलेखनात पुराणकथा आणि वास्तवता’ या ग्रंथाने वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. कोसंबी यांनी म्हटल्याप्रमाणे, या निबंधांचा उद्देश योग्यायोग्यता ठरविणे हा नाही; होईल तितका आपल्या ज्ञानाचा उपयोग करून परिस्थितीचे विश्लेषण करणे इतकाच निबंधकाराचा उद्देश आहे.
लेखक | दामोदर धर्मानंद कोसंबी |
---|---|
अनुवाद | वसंत तुळपुळे |
पृष्ठसंख्या | 238 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.