Additional information
लेखक | प्रदीप पुरंदरे |
---|---|
पाने | १०० |
बांधणी | पेपरबॅक |
ISBN | 978-93-93134-67-7 |
Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00.
प्रदीप पुरंदरे यांच्या कविता हा मराठी कवितांमधला एक अगदी वेगळा, आशयघन असा विद्रोही ठसा उमटवणारा, ‘फिनॉमेनॉन’ आहे. कवितेत आजपर्यंत इतका वेगळा आवाज इतक्या ठामपणे उमटल्याची उदाहरणे काही निवडक कवी (उदाहरणार्थ नारायण सुर्वे, यशवंत मनोहर) सोडले तर सापडणे दुरापास्तच आहे. या सर्व कवितांमध्ये एक मध्यवर्ती सूत्र आहे आणि ते आहे शोषणाचे व त्याविरुद्धच्या संघर्षाचे. त्या शोषणाचे संदर्भ, नावगाव आणि पत्ता बदलतो; ते शोषण वर्गाच्या नावावर, जातीच्या नावावर, लिंगभेदाच्या आणि धर्मभेदाच्या नावावरदेखील सर्रास चालू असते. दिसत नसले तरी पण ते असते आणि कायम सामान्य माणसाच्या छाताडावर बसून त्याचा श्वासही कोंडते. सर्वसाधारणपणे आपल्या सभोवतालच्या भांडवली समाजात हे शोषण इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर चाललेले दिसते आणि ते इतके सर्वदूर पसरलेले आहे की जशी हवा जाणवते पण दिसत नाही, तसेच हे शोषण जाणवते पण दिसत नाही. किंबहुना हे असेच असायचे, हा जगण्याचा जणू अलिखित नियम असावा असे सर्वसामान्य माणसांना वाटत रहाते. पुरंदरेंची कविता या साऱ्या व्यवस्थेत त्यांना जाणवणाऱ्या या साऱ्या विपर्यस्त असमानतेवर आधारित शोषणाचे एकीकडे विश्लेषण करते तर दुसरीकडे त्या व्यवस्थेत पिचल्या जाणाऱ्या माणसांचा आवाजही मुखरित करते. किंबहुना ‘आहे रे’ विरुद्ध ‘नाही रे’ या दोन समाजवर्गामधला विषम तोल ही कविता प्रक्षोभ आणि विद्रोहाच्या तीव्र स्वरावर तोलून धरते.
– माया पंडीत
लेखक | प्रदीप पुरंदरे |
---|---|
पाने | १०० |
बांधणी | पेपरबॅक |
ISBN | 978-93-93134-67-7 |
Reviews
There are no reviews yet.