Additional information
लेखक | फिरोज अशरफ |
---|---|
पृष्ठसंख्या | 232 |
अनुवाद / भाषांतर | हिरा जनार्दन |
Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
आपल्या घराची वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असलेली खिडकी मोठ्या कष्टाने उघडून बाहेर पाहावे तर काय? जे दृश्य दिसते ते पाहून वाटते, ‘उगाच बंद ठेवली ही खिडकी! बाहेर आणि आत हवामान सारखेच तर आहे!…’
पाकिस्तान : समाज आणि संस्कृती हा लेखसंग्रह ही एक खिडकी आहे. भारताशी शत्रुत्वाची खूणगाठ मनाशी बांधूनच जन्मास आलेल्या पाकिस्तानातील घडामोडींचे आपल्या देशातील घडामोडींशी साधर्म्य दाखवणारी खिडकी. तिच्यातून डोकावताना सहजच मनात येते की, ‘धर्म’ हे विभक्त होण्याचे केवळ निमित्त होते. ‘ईश्वर’ असो की ‘अल्ला’… साऱ्यांचा जन्म माणसाच्याच कल्पनेतून झाला, त्यामुळे माणूस महत्त्वाचा आहे. आणि हा माणूस इथूनतिथून सर्वत्र सारखाच तर आहे. साहित्य-संस्कृती, समाजजीवन-राजकारण, भेदभाव हेवेदावे, दंगेधोपे सर्वत्र सारखेच… बदलतो तो फक्त बाह्य परिवेष-भाषा, पोशाख, चालीरीती इत्यादी इत्यादी. मात्र भरडला जाणारा, स्वतःला भरडून घेणारा आणि त्यातून बाहेर पडण्याची आस बाळगणारा माणूस – स्त्री असो की पुरुष- सर्वत्रच आहे. म्हणूनच शीर्षकातला ‘पाकिस्तान’ ही नावापुरताच आहे. पत्रकार-लेखक फीरोज अशरफ ह्यांच्या परिश्रमातून उघडलेल्या ह्या खिडकीतून डोकावल्यास कोणालाही ह्याचीच प्रचीती येईल.
लेखक | फिरोज अशरफ |
---|---|
पृष्ठसंख्या | 232 |
अनुवाद / भाषांतर | हिरा जनार्दन |
Reviews
There are no reviews yet.