Additional information
लेखक | अशोक पवार |
---|---|
पृष्ठसंख्या | 154 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
गावकुसाबाहेरचं जगणं मराठी साहित्याला नवं नाही. पण अशोक पवार यांच्या लेखनात त्याही पलीकडच्या अगदी तळातल्या भटक्या समाजाचं जगणं येतं.
वडाराच्या पोटी जन्म, पालावरची बिराडं, बिगारीचं काम फाडी-गिट्टी फोडत एका गावाहून दुसऱ्या गावी मुक्काम हलवणं, भीक मागून पोट भरणं… भटक्या समाजाच्या जगण्याची ही ‘पडझड मराठी साहित्याला नवं वळण देणारी आहे. जागतिकीकरणाच्या जल्लोषात ‘पडझड’ मधला तुक्या विचारत राहतो, “मला शाळेत मास्तर, मुलं मूळ गाव विचारतात ते कोणतं? मला माझं घर, गाव का नाही? याचं उत्तर स्वतंत्र भारतातली लोकशाही देईल का?”
“आपण किती भी शाळा शिकलो तरी वाण्या बामण्याचे थोडेच होणार ?” या तुक्याच्या आईच्या प्रश्नाचं उत्तर अजूनही ‘नाही’ असंच आहे.
ज्यांच्या बापजाद्यांनी पाषाणात लेणी, मूर्ती कोरल्या, किल्ले बांधले त्या वडार समाजाच्या जगण्याची ही पडझड !
– मेधा कुलकर्णी
लेखक | अशोक पवार |
---|---|
पृष्ठसंख्या | 154 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.