Additional information
लेखक | सिद्धार्थ देवधेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 160 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.
ज्येष्ठ कथाकार बाबुराव बागूल यांनी साठच्या दशकात ‘विद्रोह’ या कथेतून जयचंद नावाचा व्यवस्थेला आव्हान देणारा, संतापाने धगधगणारा क्रोधपुरुष जन्माला घातला. हा असा तरुण होता ज्याला परिस्थिती मजबूर करत असूनही भंगीकाम करायचं नव्हतं. परंतु एका अपरिहार्य स्थितीत तो त्या चिखलाच्या दलदलीत खेचला गेला आणि त्याचा दारुण स्वप्नभंग झाला. या कथेच्या पार्श्वभूमीवर सिद्धार्थ देवधेकर यांच्या कथा ठेवून पाहिल्यास त्यांचं वेगळेपण निराळ्या पद्धतीने सिद्ध होतं. बाबुरावांचा नायक हा शंभरातला एक ठरू शकणारा विद्रोहाचा मूर्तिमंत पुतळा होता तर देवधेकरांच्या कथांचे नायक हे शंभरातल्या नव्याण्णवांप्रमाणे अगतिक, हतबल, कंगाल आणि बंडाचा विचार स्वप्नातही करू न शकणारे सर्वसामान्य आहेत. त्यामुळेच त्यांची साधीसुधी स्वप्नं, आनंदाचे बारके क्षण, अपेक्षाभंगाचं दारुण दुःख आणि मुक्तीच्या वाटेवर बंद झालेली दारं यांची तीव्रता इतकी व्यापक होते की ती कुठल्याही संवेदनशील माणसाची आतडी पिळवटून टाकील. कातळ फोडून फोडून पहार खाली वाकावी तसं आयुष्यात खडतर अनुभवांना सामोरं जाऊन वाकलेल्या या माणसांचं आयुष्य अंतर्बाह्य रिचवून त्यांना शब्दांच्या छोट्या अवकाशातही देवधेकर अशा सहजतेने उभं करतात आणि एका तटस्थतेने त्यांच्या जगण्याची अपरिहार्यता चित्रित करतात की आपण अक्षरश: थिजून जातो. या संग्रहातल्या चारच कथांतून त्यांनी अवघ्या सफाई कामगारांचं वर्गचरित्र उभं करत त्यांच्या समग्र आयुष्याचा अवकाश तोलून धरला आहे. सफाई खात्यात नोकरीला लागणाऱ्या पोरसवदा प्रकाश दगडूपासून याच खात्यातून निवृत्त होणाऱ्या सुहास रामचंद्रपर्यंत जातिव्यवस्थेच्या अभिशापाने नामोहरम झालेल्या समाजपुरुषाची असंख्य चित्र देवधेकरांच्या लेखणीने बोलकी होत या जगण्यापासून कोसो दूर असलेल्या वाचकाच्या मनात अपराधगंड निर्माण करतात. पण देवकरांचं जीवनमान व्यापक आणि दृष्टी करुणामय आहे. त्यामुळेच त्यांच्या अखेरच्या कथेतला नायक आपल्या मुलाला भंगीकाम करण्यापासून परावृत्त करत स्वतः सकट आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचावतो आणि व्यवस्थेच्या अभेद्य भिंतीला खिंडार पाडतो. एका बॉयच्या जीवनातल्या निराशाजनक पहाटेच्या प्रारंभापासून सुरू झालेला हा प्रवास बुद्धाच्या करुणामयी दृष्टीने उजळलेल्या कष्टसाध्य उजेडापर्यंत येतो आणि आपल्यालाही उजळून टाकतो.
मराठी कथा साहित्याच्या दालनात सिद्धार्थ देवधेकरांच्या या कथा स्वतःची अशी एक जागा घेऊन ताठ मानेने उभ्या राहतील हे नि:संशय.
– जयंत पवार
लेखक | सिद्धार्थ देवधेकर |
---|---|
पृष्ठसंख्या | 160 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.