Additional information
लेखक | जयसिंग पाटील |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक |
Original price was: ₹180.00.₹150.00Current price is: ₹150.00.
जयसिंग पाटील हे नाटककार म्हणून मराठी वाचकांना परिचित आहेत. ‘वेड्या कुंभाराचं काय झालं?’ हे त्यांचं गाजलेलं नाटक. त्यांची ‘नामशेष होणारा माणूस!’ ही पहिलीच कादंबरी. पहिलेपणाच्या कोणत्याच खुणा नसलेली. मानवी नात्यांचा सखोल शोध घेणारी. माणसा-माणसांमधील संबंध शोधताना हा लेखक मानवी वर्तनव्यवहारासंदर्भातील गुंतावळ शोधता शोधता नव्या गुंत्यांचे नवे विश्व आपल्या समोर साकार करतो. दर्शनी मुख्य आशयसूत्र परिचित वाटत असले तरी सशक्त उपआशयसूत्राच्या सूचना, शक्यता अधिक विस्तारीत झाल्याचे प्रत्ययाला येते. ही कादंबरी माणसाचे ढासळणे, खोलवर जखमी होणे आणि पुन्हा नव्याने नवी गुंतागुंत अंगावर घेणे या मानवी प्रवृत्तीची शोधगाथा बनते. ओघवते कथन, नाट्यात्मता आणि सूक्ष्म तपशिलांना लाभलेली चिंतनशीलतेची जोड यामुळे ही कांदबरी महत्त्वाची ठरते. मराठी वाचक जयसिंग पाटील यांच्या या कादंबरीचे स्वागत करतील, अशी खात्री वाटते.
– राजन गवस
लेखक | जयसिंग पाटील |
---|---|
पृष्ठसंख्या | 148 |
बांधणी | पेपरबॅक |
Reviews
There are no reviews yet.