Additional information
लेखक | |
---|---|
पृष्ठसंख्या | 106 |
Original price was: ₹150.00.₹135.00Current price is: ₹135.00.
ध्येयाच्या वाटेवरील ‘अनंत’ प्रवास’ । राज गोडबोले
‘ध्येयाच्या वाटेवरील ‘अनंत’ प्रवास’ हे नांदेड येथील अत्यंत क्रियाशील कार्यकतें कॉ. अनंतराव नागापूरकर यांचे चरित्र आहे. माझे विद्यार्थी मित्र राज गोडबोले यांनी ते अत्यंत परिश्रमाने लिहिले आहे. एखाद्या निबीड अरण्यात पहिल्यावहिल्या माणसाने प्रवेश केल्यानंतर तो संपूर्ण प्रदेश सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी किती कष्ट घेतले असावेत याची कल्पना सहजासहजी, अत्यंत विकसित आणि समृद्ध प्रदेशाला पाहून येणे अशक्य आहे. हे विधान भौतिक प्रगती पाहून तर्क करावा यासाठी जेवढे महत्त्वाचे आहे अगदी त्याच पद्धतीने आजच्या एखाद्या सांस्कृतिकदृष्ट्या विकसित प्रदेशातले विकासाचे आरंभ कसे होत असावेत हे समजून घेतानाही महत्त्वाचे आहे. ज्या काळात मराठवाडा प्रदेश अगदीच मध्ययुगीन अवस्थेत जगत होता त्या काळात परिवर्तनाच्या प्रदेशात मराठवाड्यातील माणसांना प्रशासनाला आणि समाजाला खेचून आणणाऱ्यांना किती कष्ट पडले असतील हे समजून घ्यायचे असेल तर कॉ. अनंतराव नागापूरकरांचे हे चरित्र एक इतिहास सामग्री म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘अनंत’ कष्टाच्या प्रवासी नेत्याचे हे चरित्र वाचकांना लाभदायक ठरेल याची मला खात्री आहे.
– दत्ता भगत
Reviews
There are no reviews yet.